Bhiwandi Mayor Election 2026: भाजपचा बंडखोर महापौर; भिवंडीत काँग्रेसने भाजपचा ‘गेम’ कसा केला ?

Bhiwandi Mayor Election 2026 : भाजपचे नगरसेवक एकप्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादीने फोडत धक्का दिलाय. नेमकी भिवंडीमध्ये राजकारण कसं फिरल.

  • Written By: Published:
Bhiwandi Mayor Election Naryan Chaudhari

Bhiwandi Mayor Election 2026: चंद्रपूर आणि भिवंडी महानगरपालिकेची महापौर निवड राज्यात सर्वाधिक गाजली. चंद्रपूरमध्ये बहुमत नसतानाही उद्धव ठाकरे सेनेच्या पाठिंब्यावर भाजपचा (BJP) महापौर झाला. सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसला मोठा झटका बसला. त्याचा बदला काँग्रेसने भिवंडीमध्ये घेतला. भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी (Narayan Chaudhari ) हे काँग्रेस (Congress) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौरपदावर विराजमान झालेत. आतापर्यंत काँग्रेसचे नेते, नगरसेवकांचे गट फोडण्यास माहीर असलेले भाजपचे नगरसेवक एकप्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादीने फोडत धक्का दिलाय. नेमकी भिवंडीमध्ये राजकारण कसं फिरलं, भाजपचा काँग्रेसेने कसा गेम केलाय हेच पाहुया…


काँग्रेस सर्वात मोठा पक्ष पण बहुमत कुणालाच नाही ?

आता आपण भिवंडीतील पक्षीय बलाबल पाहुया. 90 जागा असलेल्या भिवंडीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हतं. 30 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बारा जागा मिळाल्या. तर भाजपने 22 जागा जिंकल्या. तर शिवसेनेने 12 जागा जिंकल्या. समाजवादी पक्षाचे सहा, कोणार्क विकास आघाडीचे चार, भिवंडी विकास आघाडीचे तीन, एक अपक्ष असे बलाबल होतं.


भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना

महापालिकेतील सत्तेसाठी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व समाजवादी पक्षाने मिळून भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली होती. या फ्रंडकडे 48 नगरसेवक झाले होते. त्यामुळे या फ्रंटचा महापौर होणार हे निश्चित झालं होते. तारिक मोमिन यांचे नावही जाहीर झालं होतं. या आघाडीचे नेतृत्व आमदार रईस शेख यांच्याकडे देण्यात आले होते. परंतु समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवकांची रईस शेख यांच्यावर नाराजी होती. त्यामुळे समाजवादी पक्ष सेक्युलर फ्रंडमधून बाहेर पडला. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे कोंडी झाली. दुसरीकडून भाजप 22 आणि शिवसेनेचे बारा असे 34 नगरेसवक महायुतीचे होत होते. त्यात कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी आणि समाजवादीचे मदत झाल्यास महायुती संख्याबळ जुळत होतं. पण शिंदेसेना आणि भाजपचं मतभेद उफाळून आलं. त्यामुळे चार नगरसेवक असलेले कोणार्क विकास आघाडी महत्त्व आलं होतं. पण या आघाडीचे प्रमुख विलास पाटील यांना जुन्या आर्थिक गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी अटक केली.

नारायण चौधरींची उमेदवारी बदलली आणि गेम फिरला
भाजपने आधी नारायण चौधरी यांनाच महापौरपदाचा अर्ज भरण्यास सांगितला. त्यांनी अर्जही भरला. पण एेनवेळी भाजपने नगरसेवक स्नेहा पाटील यांना महापौरपदासाठी अर्ज भरायला लावला. त्यामुळे नारायण चौधरी प्रंचड नाराज झाले आणि तिथून गेम फिरली. नारायण चौधरी हे सहा नगरसेवक बरोबर भाजपमधून बाहेर पडले. हीच संधी काँग्रेस व राष्ट्रवादीने साधली. भिवंडीचे राष्ट्रवादीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी जुने सहकारी असलेले नारायण चौधरी यांना आपल्याकडे घेतलं आणि महापौरपदाची उमेदवारी जाहीर केलीच. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाही, याची काळजीही घेतली.


एकनाथ शिंदेंनी भाजपला डावलले

तर शिवसेनाही भाजपबरोबर गेली नाही. शिंदेसेनेकडून बाळाराम चौधरी व सुचित्रा म्हात्रे यांना उमेदवारी दिली. परंतु त्यांनी माघार घेतली. शेवटी कोणार्क विकास आघाडीचे अटकेत असलेल्या विलास पाटील यांना शिवसेना, समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला. तिरंगी लढतीत नारायण चौधरी हे 48 मते घेऊन महापौर झाले. तर कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना 25 मते मिळाली. तर भाजपचा उमेदवार स्नेहा पाटील यांना 16 मते मिळाली. त्या तिसऱ्या स्थानावर राहिल्या. हा भाग भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा होम ग्राउंड मानल जातं. व्हीप बजावूनही भाजपचे नगरसेवक फुटले आहे. त्यामुळे आता बंडखोरांवर कारवाई इशारा भाजपने दिलाय. ज्या भाजपने नगरपालिका, महानगरपालिकेत काँग्रेसला धक्का दिलाय. त्याच काँग्रेसने भाजपचे नगरसेवक फोडून चंद्रपूरची परतफेड केली हे नक्की.

follow us