नागपूर मेट्रोत गैरव्यवहार, ठराविक लोकांनाच कंत्राटे…; फडणवीस-गडकरींचे नाव घेत जयंत पाटलांचा मोठा आरोप
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पातील (Nagpur Metro Project) भ्रष्टाचारावरून जोरदार टीका केली. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचाही उल्लेख केला. पाटील यांनी भाजप नेत्यांचा उल्लेख केल्याने आमदार आशिष शेलार चांगलेच संतापले होते. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
बिझनेस अकाऊंट अन् चॅनेल्सना व्हाट्सअप देणार ब्लू टीक; असा होणार फायदा…
आज सभागृहात बोलतांना जयंत पाटील यांनी नागपूर मेट्रोमध्ये झालेल्या गैरव्यवहारावरून सदनात सरकारला घेरले. ते म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभेत सर्वांनी पैशांचा महापूर बघितला. त्याचे उगमस्थान हे भ्रष्टाचाराचे आहे. सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. एखादा प्रकल्प किंवा निविदा अशा प्रकारे मॅनेज केले जाते की, ऑडिटमध्ये काही येणार नाही. त्याचे उदाहरण म्हणजे नगरविकास विभागामार्फच होत असलेली मेट्रोची निर्मिती. उपमुख्यमंत्री यांच्या नागपूर शहरातील मेट्रोबाबत कॅगचा अहवाल समोर आला आहे. यात मोठ्या प्रमाणवर गैरव्यवहार झाला. याप्रकरणी कॅगने प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढलेत, असं पाटील म्हणाले.
दानवेंच्या प्रत्युत्तरात दरेकर चुकले; म्हणाले, महायुतीचा शिव्या देण्याचा धंदा..,
मेट्रोची ठराविक लोकांनाच कंत्राटे
ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी असताना देखील नागपूरमध्ये हा गैरव्यवहार कास झाला, हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने नागपूर मेट्रोबाबत भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने विहित केल्यानुसार वेब पोर्टलवर निवीदा प्रकाशित कऱण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने स्पर्धात्मक दर मिळविण्यासाठी निविदांची व्यापक प्रसिद्धी सुनिश्चित करण्याची संधी गमावली. त्यामुळे मोजक्या लोकांनाच कंत्राटे मिळावीत, अशी व्यवस्था निर्माण झाली आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.
दरम्यान, जयंत पाटील यांनी फडणवीस आणि गडकरींचा उल्लेख केल्यानं आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, पाटील यांनी फडणवीस आणि गडकरींचा उल्लेख केला. पण कुणावर आरोप करायचा असेल तर नोटीस द्यावी लागेल. जे सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यांचे नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही. पाटील यांनी ज्या दोन नेत्यांची नावे घेतली, ते त्यांनी मागे घ्यावी. त्यांना रेकॉर्डवर ठेवू नये, अशी मागणी पाटील यांनी केली.
शेलार आंधळे-बहिरे
त्यावर जयंत पाटील म्हणाले, मी काय बोलतोय हे त्यांना कळत नाही. ते आंधळे आणि बहिरे झालेत. रेकॉर्डमधून काढून टाकण्यसाारखं वाईट मी काहीच बोललो नाही. मी त्यांच्यावर कुठलाही आरोप केला नाही. मी फक्त त्यांच्या शहरात हा प्रकार घडल्याचं म्हटलं.