धनंजय मुंडेनंतर कोकाटेंचा नंबर, फडणवीसांच्या नाराजीनंतर अजितदादांचं ठरलं?

धनंजय मुंडेनंतर कोकाटेंचा नंबर, फडणवीसांच्या नाराजीनंतर अजितदादांचं ठरलं?

Ajit Pawar call to Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate)यांचा विधानसभेत मोबाइलवर जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता कोकाटे आणि अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) फोनवरून संभाषण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावर मंगळवारी सकाळी ९ वाजता कोकाटे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे.

मोठी बातमी! राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा 

फडणवीस म्हणाले – भूषणावह नाही…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी कोकाटेंच्या व्हिडिओविषयी नाराजी व्यक्त केली. जे घडलं ते अतिशय चुकीचं आहे. विधान भवनामध्ये अशा प्रकारची गंभीर चर्चा सुरू असताना आपलं काम नसलं तरी आपण गंभीर असणं आवश्यक आहे. साधारणपणे सभागृहात कामकाजाचे कागद वाचत असता, किंवा इतर काही वाचत असता तर ते ठिक आहे. पण रमी खेळणं हे काही बरोबर नाही. कोकाटेंनी त्यावर स्पष्टीकरणं दिलंय, त्यांनी काहीही सांगितलं तरी ते काही आमच्यासाठी भूषणावह नाही, अशा शब्दात फडणवीसांनी ठणकावलं.

मोठी बातमी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा 

मुख्यमंत्री फडणवीसांच्या या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या फोननंतर कोकाटे यांनी सिन्नर येथील दूध संघ कार्यालयात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान, अजित पवार आणि कोकाटे यांच्यात काय चर्चा झाली, तसेच कोकाटेंनी बोलावलेल्या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, कोकाटे मंगळवारी सकाळी ९ वाजता सिन्नर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काही निर्णय जाहीर करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या फोनबाबत कृषिमंत्र्यांकडे विचारणा केला असता अजित पवारांचा फोन आला नसल्याचं कोकाटेंनी एका वृत्त वाहिनीला सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube