SIT चौकशी लागताच जरांगेंची भाषा बदलली; ‘फडणवीस’वरुन आता ‘फडणवीस’साहेब
Manoj Jarange News : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. याचदरम्यान, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याचं दिसून आलं. एकीकडे सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतरही मराठा समाधानी नसल्याची परिस्थिती पाहायला मिळते. फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर आता राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी सुरु आहे. त्यानंतर आज सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांची भाषाच बदलल्याचं दिसलं. आधी जरांगे फडणवीस म्हणायचे त्यानंतर आता देवेंद्र फडणवीससाहेब असा उल्लेख जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे एसआयटी चौकशी लागताच जरांगेंची भाषाच बदलली असल्याचं बोललं जातंय.
ठाकरेंना खुश करण्यासाठी आरोप, हे बदनाम आम्हाला करण्याचं षडयंत्र; शिंदे गटाने सरोदेंचे आरोप फेटाळले
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं मागील सहा महिन्यांपासून उपोषण, आंदोलनाचं सत्र सुरु आहे. यामध्ये त्यांनी दोन ते तीनवेळा आमरण उपोषण केल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही उपोषणादरम्यान, त्यांनी सरकारला मुदत दिली होती. नंतर जरांगे पाटलांची पदयात्रा मुंबईत दाखल होताच राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांचा अध्यादेशच काढला होता. मात्र, या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा उपोषण सुरु झालं अन् मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर विधाने केली होती. त्यानंतर विधी मंडळात त्यांच्या आंदोलनाची चौकशीची मागणी करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशावरुन मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी सुरु आहे.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा निकाल जाहीर, वाशिममधील शाळा ठरली अव्वल
मनोज जरांगे बोलताना म्हणाले, सरकारने जाणून बूजून खोटे आरोप करुन मराठा समाजाचे तरुण गुंतवण्याचं काम सुरु आहे. हे फडणवीससाहेब करत आहे. ओबीसीतून आरक्षणाची मागणी असताना सरकारने 10 टक्के आरक्षण दिलंय पण सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केलेली नाही म्हणजे हा अधिसूचनेचा अवमान आहे. मराठा समाजाच्या नाराजीची लाट कशी अंगावर घेत आहात? असा सवालही मनोज जरांगे यांनी यावेळी केला आहे.
मराठ्यांनी मर्यादा सोडल्यावर करेक्ट कार्यक्रम :
राज्यात मराठा समाज कुठेही समाधानी नाही. आता फडणवीससाहेबांची भाषा आता मुख्यमंत्रीसाहेब बोलू लागले आहेत. पूर्वी सहा महिने शिंदेंवर विश्वास ठेऊन सहा महिन्यांचा वेळ दिला होता. ते आता आम्हाला उलट बोलालयाल लागलेत. कोणी लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो असं मुख्यमंत्री म्हणतात तर मग सरकारने मर्यादा सोडल्यावर मराठे कसा करेक्ट कार्यक्रम करतात ते पाहा असा इशाराही थेट मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
दरम्यान, राज्यात सध्या भ्रष्टचाऱ्यांची चौकशी लावण्याऐवजी सरकारने एका शेतकऱ्याच्या पोराची एसआयटी चौकशी लावली आहे. एसआयटी चौकशीत काही होऊ मला फरक पडणार नसून मी जेलमध्येही जाणारा असल्याचं मनोज जरांगे यांनी ठणकावले आहे. मात्र एकीकडे एसआयटी चौकशी आधी ते फडणवीस यांना एकेरी भाषेत उल्लेख करताना दिसून येत असत. आता मात्र मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस असा उल्लेख करीत असल्याचं पाहायला मिळत आहे.