नागपूर : भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहतील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत? […]
नागपूर : नागपूर न्यास जमीन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तत्कालीन नगरविकास मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर बोट ठेवण्यात आलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जमीनीचे वाटप झालं कसं? असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. यावरुनच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. काही लोकं मुख्यमंत्र्यांना […]
बेळगाव : आजपासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू झाले आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. कर्नाटकात कलम 144 लागू केले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा बेळगावमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. कोल्हापूरमधील महाविकास आघाडीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या […]
नागपूर : मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात बावनकुळे हे बोलले. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जो जो समाज फडणवीस यांच्याडे गेला, त्या समाजावरी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे […]
नागपूर : सीमावर्ती लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार पुर्णपणे उभा आहे. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका असणार आहे. यासंदर्भात आज लोकतांत्रिक पद्धीतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली. या संदर्भातली चर्चा कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांशी करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेदत दिली. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागाबाबत राज्याची भूमिका तसूभरही मागे […]
मुंबई : नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासोबत विधानभवनात दाखल झाल्या. त्यामुळे त्यांनी एकाचवेळी आई आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी निभावली आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनाची पायरी […]