मुंबई : ‘पोटनिवडणुका या स्थानिक निवडणुका असतात त्यामुळे काही त्रुटी उणीवा राहिल्या असतील. त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचे कार्यकर्ते यामुळे खचून जाणारे नाही. पण एका विजयाने विरोधकांनी देखील हूरळून जाऊ नये.’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. त्याचबरोबर ते असं देखील म्हटले की, कसबा (Kasba) पोटनिवडणुकीचा आनंद महविकास […]
पुणे : पुणे जिल्हातील माझी ही पहिलीच निवडणूक होती. मी कसबा पेठ पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यात माझा पराभव झाला. मात्र, माझ्या पायगुणामुळेचे काँग्रेसचा उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे, असा दावा कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukle) यांनी केला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले […]
मुंबई : ईशान्येकडील (North East) नागालँड (Nagaland), त्रिपुरा (Tripura) आणि मेघालय (Meghalaya) या तीन राज्यांतील निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. या तीनही राज्यांतील निवडणुकांकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले होते. यातील नागालँडकडे विशेष करून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले होते. कारण, नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) १२ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ उमेदवार […]
मुंबई : आम्ही कसब्यात प्रचार करून हरलो असे महाविकास आघाडी (MVA) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणत असतील तर मग चिंचवड पोटनिवडणुकीत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचार करत होते. मात्र, तरीदेखील चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांचा पराभव झाला आहे. […]
मुंबई : एखादा सतत जिंकणारा उमेदवार पडला की चर्चा होतच असते. त्यात नवीन काही नाही. कसबा मतदार (Kasba Bypoll) संघातील आजच्या निवडणूक निकाल देखील त्याला अपवाद नाही. आम्ही सर्व्हे केला होता. त्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना लोकांची सहानुभूती असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु, त्यांची सहानुभूती नंतर कमी होईल, असे आमचा अंदाज होता. मात्र, […]
पुणे : गेल्या तीन वर्षात पाच विधानसभा (Five MLA) सदस्यांचे आजारपण व इतर कारणांनी निधन झाले. राज्यातील देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर, अंधेरी आणि चिंचवड आधी विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये सहानुभूतीची लाट म्हणून जयश्री जाधव (Jayshree Jadhav), ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या तीन महिला आमदार निवडून विधानसभेत गेल्या आहेत. तसेच […]