‘राज ठाकरेंनी पायावर धोंडा पाडून घेतला’; ठाकरे गटाच्या नेत्याची सडकून टीका
Rajan Salvi On Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) अद्याप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती. अखेर गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर राजकीय नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. राज ठाकरे यांनी पायावर धोंडा पाडून घेतला असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केली आहे.
Ajit Pawar : आता साहेबांच्या सुनेला निवडून द्या; सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांचं बारामतीकरांना आवाहन
राजन साळवी म्हणाले, राज ठाकरेंनी धोंडा पाडून घेतलायं. राज ठाकरे यांनी आत्तापर्यंत सेटिंग्जच केलीयं. आज देश भाजप मोदींबद्दल लोकप्रियता लयाला गेली आहे. असं असतानाही राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देणं म्हणजे पायावर धोंडा पाडून घेतला आहे. लोकसभेला पाठिंबा अन् विधानसभेला कामाला लागा अशा सूचना द्यायच्या हे दुर्देव असून मनसेवर लोकांचा विश्वास नाही मनसेला नाकारलं असल्याचं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांना वाटलं वेगळे झालो म्हणजे आता आपले हात आकाशाला हात टेकले आहेत. मागील निवडणुकीत 13 आमदार होते, आज त्यांचा एकही आमदार नाही, अशीही टीका साळवी यांनी केली आहे.
Advance Booking: बॉक्स ऑफिसवर ‘मैदान’ नावाचं वादळ! रीलिजआधीच झालंय ‘एवढ्या’ कोटींचं बुकिंग
राज ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बिघडलेली असताना आपल्याला यातून पुढे जाण्यासाठी मार्ग काढायचा आहे. मनसे महाराष्ट्राला योग्य मार्ग दाखवेल. मात्र माझी महाराष्ट्रातील मतदारांना आणि जनतेला ही विनंती आहे की, कृपा करून व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका. जे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळत गेली तर पुढचे दिवस भीषण येतील. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांचा विचार करता. मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं की, मला कोणत्याही वाटाघाटी नको. मी त्यांना सांगितलं की, मला राज्यसभा ही नको विधानपरीषद ही नको. पण या देशाला चांगल्या आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा माझा पक्ष राज्यातील महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, असल्याचे राज ठाकरे यांनी घोषित केले आहे.