‘डिमॉनिटायझेशन’नंतर आता 4 तारखेला ‘डीमोदीनेशन’ करणार; ठाकरेंनी मोदींना धडकी भरवली!

‘डिमॉनिटायझेशन’नंतर आता 4 तारखेला ‘डीमोदीनेशन’ करणार; ठाकरेंनी मोदींना धडकी भरवली!

Udhav Thackeray On Pm Narendra Modi : ‘डिमॉनिटायझेशन’नंतर आता 4 तारखेला ‘डीमोदीनेशन’ करणार, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना धडकी भरवलीयं. दरम्यान, महाविकास आघाडीचे कल्याण डोंबिवली लोकसभेचे उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पाडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अमित शाहा, नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवलीयं.

Toshiba : तोशिबा कंपनीचा कर्मचाऱ्यांना झटका; 4 हजार कर्मचाऱ्यांची कपात…

उद्धव ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीतून चलनी नोटा बंद केल्या. रात्रीनंतर सगळ्याचं नोटा बंद होणार असल्याची घोषणा केली होती. तुम्ही आधी डिमॉनिटायझेशन केलं तसंच 4 तारखेला आम्ही डीमोदीनेशन करणार आहे . महाराष्ट्रात तुम्ही 25 सभा घेतल्यातं, अजून घ्या कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या महाराष्ट्रात या शेवटच्या सभा असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलीयं.

शिर्डीत ‘वंचित’ ठरणार गेमचेंजर; घसरलेला मतदानाचा टक्का कुणाला तारक कुणाला मारक ठरणार?

तसेच 4 तारखेनंत देशातून भाजपची सत्ता जाणार आहे. मोदीजी तुम्ही शब्दांचे पक्के असाल तर 75 व्या वर्षानंतर राजकारण्यांनी निवृत्ती घेतली पाहिजे. 2 वर्षांनी तुम्ही 75 वर्षांचे होणार आहात मग भाजपचं काय होणार? मोदींनंतर भाजपच्या धोंड्यांचं काय होणार? असे सवाल उपस्थित करीत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल चढवलायं.

सावरकरांचे गाईबद्दलचे विचार वाचा :
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सावरकरांवर पाच ओळी बोलून दाखवाव्यात असं खुलं चॅलेंजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गोमातेबद्दलचे विचार काय होते, हे जरा तपासून पाहा, वाचून घ्या, आम्ही आधी मातेचं रक्षण करुन नंतर गोमातेचं रक्षण करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी ठणकावूनचं सांगितलं आहे.

मणिपूरमध्ये तुम्ही उलटे का झालात?
जो गोहत्या करेल त्याला उलटं टांगणार असल्याचं अमित शाहा म्हणाले आहेत. मागील दहा वर्षांपासून मोदींचीच सत्ता आहे, दहा वर्षे तुम्ही काय केलंत? मणिपूरमध्ये महिलांचे धिंडवडे काढण्यात आले तुम्ही तिथं का उलटे झाले? मणिपुरात तुमचं खाली डोकं वर आणि पाय खाली का झाले? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज