आयुष कोमकर हत्येमध्ये पोलिसांनी आवळल्या मुसक्या; बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक

Ayush Komkar Murder Pune police Major action six arrested including Bandu Aandekar : गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री पुण्यातील नाना चौकात 20 वर्षाच्या आयुष गणेश कोमकरची (Ayush Komkar) अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. आयुष कोमकरच्या हत्येला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पाहिलं जात आहे. या प्रकरणामध्ये आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी बंडू आंदेकरसह मध्यरात्री उशिरा सहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये आंदेकरची मुलगी आणि दोन नातू यांचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री पुण्यातील नाना चौकात 20 वर्षाच्या आयुष गणेश कोमकरची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. आयुष कोमकरच्या हत्येला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे पुण्यातील टोळीयुद्धाने पुन्हा एकदा तणाव निर्माण केला आहे. 5 सप्टेंबर रोजी, गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री सुमारे आठ वाजता, पुण्यातील नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुषवर गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
डोनाल्ड ट्रम्पने अश्लील पत्र लिहिलं? कुणाला आणि कधी…डेमोक्रॅट्सने केला धक्कादायक गौप्यस्फोट
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोरांची ओळख पटली असून (Pune) त्यांची नावे यश पाटील आणि अमित पाटोळे अशी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आयुष आपल्या क्लासवरुन घरी परतत असताना गाडी (Ayush Komkar) पार्क करत असताना या दोघांनी त्याच्यावर (Vanraj Andekar Case)गोळ्या झाडल्या. एकूण 9 गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी या मारेकऱ्यांनी धडाधड ओरडत होते की ‘इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच‘ आहेत.
सरकार सोशल मीडियाच्या विरूद्ध… जेनरेशन-झेडच्या तीव्र आंदोलनानंतर नेपाळ सरकारचा युटर्न!
पोलिसांनी आयुषच्या आई कल्याणी कोमकर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला. तपासात सीसीटीव्ही फुटेजद्वारे हल्लेखोरांची ओळख पटली आहे. त्यानंतर पुणे (Pune Crime News) पोलिसांनी आंदेकर आणि कोमकर कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सुमारे 13 जणांचा समावेश आहे. बंडू आंदेकर हा टोळीचा प्रमुख असून, मागील वर्षी वनराज आंदेकर, जो बंडू आंदेकरांचा मुलगा होता, याची हत्या झाली होती. यामध्ये बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वाडेकर आई आणि आणखी दोघांना अटक करण्यात आलीय इतर आरोपींचा शोध सुरु आहे.