पासपोर्ट जप्त करायचा न्यायालयाचा आदेश असतानाही घायवळ परदेशात, कोणी शेण खाल्ले?

कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळबाबत न्यायालयीन आदेश असूनही पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात का आला नाही? हा प्रश्न उपस्तित झाला आहे.

पासपोर्ट जप्त करायचा न्यायालयाचा आदेश असतानाही घायवळ परदेशात, कोणी शेण खाल्ले?

कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या परदेशवारीबाबत नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Passport)  घायवळविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला विशिष्ट अटींवर २०२२ मध्ये न्यायालयीन जामीन मंजूर करण्यात आला. या अटींमध्ये पासपोर्ट पोलिसांकडं जमा करण्याचे निर्देश होते. मात्र, न्यायालयीन आदेश असूनही पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात का आला नाही? हा प्रश्न उपस्तित झाला आहे. तसं झालं असतं तर घायवळ देशाबहेर जाण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. त्यामुळे यामध्ये कुणी शेण खाल्लं असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

नॉट अव्हेलेबल

पासपोर्ट मिळवण्यामध्ये ‘तत्काळ योजने’त अर्जदाराला जलद पासपोर्ट मिळतो. या प्रक्रियेत पासपोर्ट आधी दिला जातो आणि नंतर काही दिवसांत पोलीस पडताळणी केली जाते. पडताळणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढे पासपोर्ट एक्ट नुसार पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करता येते. घायवळने २०१९ मध्ये तत्काळ योजनेतून मिळवलेल्या पासपोर्टसाठी झालेल्या पोलीस पडताळणी (पीव्ही) अहवालात त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं. तसंच, घरी भेट दिली असता तो उपलब्ध नाही (नॉट अव्हेलेबल) असल्याची नोंद करण्यात आली होती.

कुख्यात गुंड निलेश घायवळचा पाय खोलात; पुणे पोलिसांकडून घरावर छापेमारी, धक्कादायक माहिती समोर

हे सगळ पाहता पोलिसांनी गुन्ह्याची माहिती अवहालात देणे अपेक्षित होतं. परंतु, तसं झालेल दिसत नाही. यामुळे त्याचा पासपोर्ट कायम ठेवण्यात अडचण आली नाही. घायवळने पासपोर्ट अर्ज करताना स्वतःविरुद्ध असलेले गुन्हे लपवून चुकीचं प्रतिज्ञापत्र सादर करुण 2019 मध्ये पासपोर्ट मिळवला होता. पोलिसांनी आरोपी देशाबाहेर गेल्यानंतर हा प्रकार पासपोर्ट कार्यालयला निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्याचा पासपोर्ट जप्तीबाबत कारणे दाखवा नोटीस (एससीएन) जारी करण्यात आली. तसंच पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पण, उरतो तो प्रश्न म्हणजे यामध्ये माती कुणीतरी खाल्ली.

नुकतीच पोलिसांची जप्तीची कारवाई

निलेश घायवळच्या कोथरूडमधील घरात केलेल्या छापेमारीदरम्यान पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. याशिवाय, पोलिसांच्या हाती घायवळच्या विविध मालमत्तांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रं लागली आहेत. यामध्ये सातबारे, साठेखत आणि विविध जमिनींची कागदपत्रं यांचा समावेश आहे. याबरोबरच, घायवळच्या अनधिकृत मालमत्ता आणि थकीत कर असलेल्या मालमत्ता सीझ (जप्त) करण्याच्या कारवाईला सुरुवात करणार आहे. दरम्यान कोथरूड गोळीबार प्रकरण आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून निलेश घायवळने विदेशात पलायन केल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर त्याची बँक खाती आणि बेकायदेशीर मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत

follow us