पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Kranti Jyoti Savitribai Phule Pune University) ललित केंद्रात (Fine Arts Center) झालेला राडा राज्यात चर्चेचा विषय ठरला. केंद्रातील विद्यार्थ्यांकडून रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. ‘जब वी मेट’ नावाच्या नाटकात या कलाकरांचे वैयक्तिक आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या नाटकावरून मोठा […]
CP Amitesh Kumar : दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे (Helmets Compulsory) कायद्याने बंधनकारक आहे. मात्र सर्वप्रथम हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहून आणि संबंधित घटकांशी चर्चा करूनच हेल्मेट सक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी सांगितले. पुणे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण […]
Pune news : दोन दिवसांपासून गँगस्टर्स (Pune crime) आज अंमली पदार्थांची तस्करी करणारे आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झालेले गुन्हेगारांना बोलावण्यात आले होते. प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने त्यांना बोलावण्यात आले होते. सोशल मीडिया, मोबाईल आणि त्यांच्या माहिती अपडेट करण्यात येत आहे. गुन्हेगारी आणि उदात्तीकरण करणे तसेच खंडणीच्या प्रकारावर कठोर कारवाई केली जाईल, अशी समज देण्यात […]
पुणे : सुहास दिवसे (Suhas Diwase) यांची पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राजेश देशमुख हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुहास दिवस यांच्या जागी डॉ.राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांची क्रीडा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंब्र्याच्या उपटसुंबाला काही कामधंदे राहिलेले […]
पुरंदर : तहसिलदार कार्यालयातून ईव्हीएम मशीनचे (EVM Machine) कंट्रोल युनिट चोरीला गेल्याच्या प्रकाराची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने पुरंदरचे प्रांताधिकारी, तहसिलदार आणि पोलीस उपाधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे सुरक्षेतील त्रुटींबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत संपूर्ण अहवाल 12 फेब्रुवारीपर्यंत […]
Lok Sabha 2024 : पुण्यात लोकसभा निवडणुकांसाठी मैदान तयार (Lok Sabha Election 2024) होत आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नसला तरी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यंदा मनसेही (MNS) पुण्यात उमेदवार देणार आहे. उमेदवार कोण असेल याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, या उमेदवारीवरून मनसेच्या आजी माजी शहराध्यक्षांत वाद धुमसू लागला आहे. वसंत मोरे की […]