नानापेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आयुष उर्फ गोविंदा कोमकर याची हत्या करण्यात आली.
5 सप्टेंबर रोजी, पुण्यातील नाना पेठेत दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकरवर गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये पोलिसांनी बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मागील अकरा दिवसांपासून तिचा मृत्यूशी लढा सुरू होता. मात्र हा लढा अपयशी ठरला आहे.
18 वर्षीय आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. हा हल्ला वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या बदल्यासंबंधी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुंड स्वतःच्या भाच्याची हत्या करतील असा अंदाज पोलिसांना नव्हता अशी कबुली पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यानी दिली.
दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते.