पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Chinchwad byelection) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांनी बुधवारी नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात दिवसभर पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठका घेऊन प्रचारात जोरदार आघाडी घेतली. आज झालेल्या पदयात्रांमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावत एकजुटीचा प्रत्यय आणून दिला. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तरी […]
पुणे : भाजपचे खासदार गिरिश बापट यांना त्यांच्या आजारपणात निवडणुकीच्या प्रचारात उतरुन जीवाशी खेळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. पुण्यातील कसबा आणि पिंपरी पोटनिवडणुकीसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. राजकीय वर्तुळात सध्या गिरीश बापट नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर […]
Chinchwad Bypoll : पिंपरी चिंचवड निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून स्टार प्रचारकांच्या सभा होत आहेत. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad Bypoll) मतदारसंघात राहुल कलाटे (Rahul Kalate) हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक आता तिरंगी होणार आहे. या निवडणुकीत कलाटे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. या प्रश्नावर भारतीय […]
पुणे : भारतीय जनता पार्टीला (BJP) कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (Kasba-Chinchwad Bypoll) अंतर्गत नाराजीचा तीव्र फटका बसण्याची शक्यता असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कसबा मतदार संघात खासदार गिरीश बापट (Girish Bapat) आणि माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला (BJP) पाठिंबा दिला आहे. मनसेमध्ये कसब्याची पोटनिवडणूक लढवण्यासाठी ( Kasba By Election) इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या होती. मात्र असं असताना देखील मनसेने भाजपला पाठिंबा देऊन नवी खेळी खेळली आहे. आता मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये (MNS) जोरदार जुंपल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या ५ वर्षात गिरीश […]
पुणे : वंचित बहुजन आघाडी (VBA) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे असं दिसतंय. परंतु, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा, असे विनंती पत्र आलेले नाही म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीत […]