पुणे : कसबा (Kasba Bypoll Election) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll Election) विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा (Election Campaign) आजच (24 फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर कुठलाही प्रचार करता येणार नाहीये. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने सर्वच पक्ष प्रचाराच्या मैदानात ताकदीने उतरत आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि […]
पुणे : हा कसबा हिंदुत्ववादी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे आहे, इथे देशभक्तांचा मेळा पाहायला मिळत असल्याची मांडणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचा शनिपार चौकात समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. या रोड शोमध्ये फडणवीसांनी कसबा पेठ […]
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचे, कष्टकऱ्यांचे शहर आहे. या भागाचे काम करण्याची संधी ज्यावेळी मला येथील जनतेने दिली. तेव्हा मी सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन काम केले. प्रत्येकाला चांगली पदे दिली. एका महिला भगिनीने तर मला स्थायी समितीचे अध्यक्षपद द्या नाहीतर मी जीवच देईन, अशी धमकी दिल्याचा किस्सा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार […]
पुणे : एखाद्या कुटुंबावर वाईट प्रसंग ओढवला तर मदतीला जाण्याची आपली परंपरा आहे. हा वारसा, विचार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीत राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेतेमंडळी येथे येऊन आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे नाहीत, हेच दाखवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून छेद देण्याचे काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या राष्ट्रवादी […]
पुणे – पिंपरी चिंचवड काँग्रेसला झटका..पिंपरी चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज अश्विनी जगताप यांच्या प्रचार सभेत आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजप प्रवेश केला आहे. साठे हे गेली 7 वर्ष शहराध्यक्ष होते. गेल्या वर्षी कैलास कदम यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये सुप्त संघर्ष होता. शहर […]
पुणे : मुघलांच्या काळातला जो झिझिया कर होता, तसाच शास्ती कर फक्त पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने लागू केला होता, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत ते चिंचवडमध्ये बोलत होते. फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, मुघलांच्या काळात जसा झिझिया कर होता तसा शास्ती कर फक्त पिंपरी चिंचवड कर होता. राष्ट्रवादीचे सरकार असताना त्यांनी लावला. […]