“मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुन्हा खेळणार नाही..” विराटने दिले कसोटीतून निवृत्तीचे संकेत

“मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुन्हा खेळणार नाही..” विराटने दिले कसोटीतून निवृत्तीचे संकेत

Virat Kohli : पाकिस्तानातील चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियातील (Team India) काही सिनियर खेळाडूंच्या भविष्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीच्या (Rohit Sharma) चर्चांना नकार देत निवृत्त होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. परंतु, विराट कोहलीने (Virat Kohli) यावर अजून तरी स्पष्ट भाष्य केलेलं नाही. परंतु, आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार नसल्याचे मात्र त्याने स्पष्ट केले आहे.

विराट-रोहित-जडेजाला होणार कोट्यवधींचे नुकसान तर गिल-जैस्वालला लागणार जॅकपॉट, कारण काय?

आयपीएल स्पर्धा लवकरच सुरू होणार आहेत. याआधी बंगळुरू फ्रँचायझीच्या एका इव्हेंटमध्ये विराट कोहलीने अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. याच दरम्यान विराटला त्याच्या फॉर्मबाबत प्रश्न विचारण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफीत विराटने दोनशेपेक्षा जास्त धावा केल्या पण त्याआधीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो पूर्ण अपयशी ठरला होता. या दौऱ्यात त्याला फक्त एकच शतक करता आले. या दौऱ्यातील फलंदाजी संदर्भात विराटला प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना विराट म्हणाला, कदाचित आता मी पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळताना दिसणार नाही. म्हणून भूतकाळात जे घडलं त्याबाबत मी समाधानी आहे. भारतीय संघाचा पुढील ऑस्ट्रेलिया दौरा 2027 वर्षाच्या अखेरीस होणार आहे. या दौऱ्यासाठी अजून तीन वर्षांचा काळ बाकी आहे. त्यामुळे इतके दिवस क्रिकेट खेळत राहण्याची विराटची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळेच कदाचित विराटने असे वक्तव्य केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विराट कोहली एकाच धावेवर बाद, 14 वर्षीला मुलीला धक्का बसला.. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरल्यानंतर विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. आता आयपीएलनंतर टीम इंडियाचा इंग्लंड दौरा आहे. विराट या दौऱ्यासाठी भारीतीय संघात असेल का, जर त्याची निवड झाली तर या दौऱ्यानंतर विराट क्रिकेटमधून निवृत्ती घेईल का असे सवाल मिडिया, एक्सपर्ट्स आणि फॅन्स विचारत आहेत. यातच विराटच्या वक्तव्याने क्रिकेट चाहत्यांचे टेन्शन वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात निवृत्तीबाबत विराट कोहली काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube