ICC च्या संघात टीम इंडियाचा दबदबा! 11 पैकी 6 खेळाडू भारतीय, कॅप्टन्सीही ‘रोहित’च्या हाती
ICC Announced World’s Men’s ODI Team 2023 : विश्वचषकात सलग दहा सामने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला. त्यानंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने (ICC Announced World’s Men’s Team) चांगली कामगिरी केली. आता आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. आयसीसीने (ICC) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेट संघ जाहीर केला आहे. या संघात तब्बल 6 भारतीय खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संघाचे कर्णधारपददेखील रोहित शर्माकडेच (Rohit Sharma) देण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सलाही (Pat Cummins) या संघात जागा मिळाली नाही. या संघात सहा भारतीय खेळाडू आहेत. ऑस्ट्र्लिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी दोन तर न्यूझीलँडच्या एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. 2023 च्या विश्वचषकातील फायनल सामन्यातील आठ खेळाडूंचा या जागतिक संघात समावेश आहे. प्लेइंग 11 मध्ये पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लँड या संघातील एकही खेळाडू नाही.
IND vs ENG : विराटच्या जागी कोण? ‘या’ दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा; BCCI लवकरच करणार घोषणा
आयसीसी संघात कोणते खेळाडू ?
या संघात रोहित शर्मासह टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल, विराट कोहली यांच्यासह सिराद, शमी आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड आणि अॅडम झाम्पा यांना संधी देण्यात आली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेन आणि मार्को यानसेन यांची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या डेरिल मिचेल या एकमेव खेळाडूला या जागतिक संघात संधी मिळाली आहे.
मागील वर्षात रोहित शर्माची कामगिरी चांगली राहिली होती. त्याने 52 च्या सरासरीने 1255 रन केले. तर शुभमन गिलची कामगिरी विश्वचषकात फारशी चांगली राहिली नाही. मात्र त्याने एक द्विशतक केले होते. न्यूझीलंडविरुद्ध शुभमनने 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली होती. 2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये शुभमनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने या वर्षात 1584 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडला (Travis Head) मोठ्या सामन्यांचा खेळाडू मानले जाते. विश्वचषकातही त्याने जबरदस्त कामगिरी केली. सेमीफायनल आणि फायनल सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कारही मिळवला होता.