शिखर बॅंक घोटाळ्यातील क्लोजर रिपोर्ट हा देशातली सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. दरम्यान, शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी न्यायालयात या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून त्यामध्ये कुठेही आरोप सिद्ध होत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अजित […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. त्यानंतर आज (31 जानेवारी) जरांगे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, अशाप्रकारे चॅलेंज देऊन आणि ओबीसी बांधवांच्या सभा घेऊन भुजबळ राजकीय पोळी भाजत आहेत. भुजबळ […]
Rahul Gandhi News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर किरकोळ दबाव आला अन् नितीश कुमार बदलले, असल्याची टीका करीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खरं सांगितलं आहे. दरम्यान, भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या घटक पक्षातील जनता दलाचे नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला […]
Ahmedngar News : राज्यात येत्या काळात निवडणुका आहे. मात्र आता विकासासाठी युवकांनी विचार करणे गरजेचे आहे. दिल्लीमध्ये ढुमक वाजलं की गुबुगुबू मान डोलावणारे नंदी बैल पाठवायचे नाही. तर आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ दिल्लीत पाठवायचे अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निशाणा साधला. मात्र कोल्हे यांचा निशाणा हा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर […]
2021 ची चंदीगड महापालिकेची निवडणूक. आम आदमी पक्षाने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ भाजपने 12 आणि काँग्रेसने आठ जागा जिंकल्या. शिरोमणी अकाली दलाच्या वाट्याला एक जागा आली. आता सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा नैसर्गिक क्लेम आम आदमी पक्षाचा असेल असे तुम्हाला वाटत असेल तर थोडे थांबा. इथे बहुमत नसतानाही यंदा सलग तिसऱ्या वर्षी महापौरपदावर […]
चंदीगड : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या साथीने कमळ फुलविल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी चंदीगडचीही मोहीम फत्ते केली आहे. बिहारसोबत चंदीगडचेही प्रभारी असणाऱ्या तावडेंनी सलग तिसऱ्या वर्षी बहुमत नसतानाही भाजपचा (BJP) महापौरपदाचा उमेदवार विजयी करुन दाखविला आहे. तावडेंच्या या कामगिरीमुळे भाजपने सगल नवव्या वर्षीही महापौरपद आपल्याकडे राखले आहे. (BJP’s Manoj Sonkar won […]
सपने नही हकीकत बुनते है… लोकसभा निवडणूक जवळ येताच भाजपने आगामी निवडणुकांसाठी आपले स्लोगन जाहीर केले. ‘अबकी बार मोदी सरकार’ जसे प्रभावी ठरले तसेच हे स्लोगन प्रभावी ठरण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मित्र पक्षांना सोबत घेतले, राज्य प्रभारींची घोषणा झाली. प्रचारही सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी करुन निवडणुकीचा […]
मुंबई : भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वसनीय समजले जाणारे अनिल देसाई आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार वंदना चव्हाण हे लवकरच माजी खासदार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
पुणे : पुणे शहर माझी जन्मभूमी आणि आता कर्मभूमी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचे असल्याचा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर यांचे नाव चर्चेत आहे. त्यानंतर आता जन्मभूमीनंतर पुण्याला कर्मभूमी बनवण्याचा निर्णय देवधरांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या […]
नवी दिल्ली : मार्च महिन्यात लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे. या जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून येत्या 27 फेब्रुवारीला या जागांसाठी मतदान होणार आहे. (Election Commission of india has announced […]