उद्धव ठाकरेंनी माकडं अशी टीका केल्यांतर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच मानसिक संतुलन बिघडलं आहे.
नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तुतारीचा प्रचार करत असल्याचा थेट आरोप केला आहे. आपल्याकडे व्हिडिओ आहेत असंही ते म्हणाले.
जालना लोकसभेचे उमेदवार प्रचार सभेत बोलताना म्हणाले केंद्रात जिंकलो तर लगेच गरम-गरम तव्यावर विधानसभेची पाळी भाजून घ्याली लागणार आहे.
'तो' कार्यकर्ता पैसे वाटत होता, म्हणून मी रोखलं, माझी कोणतीही चूक नसल्याचं स्पष्टीकरण आमदार दत्ता भरणे यांनी दिलं आहे.
मी मेलो तरी चालेल पण इतर कुणाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवणार नाही असा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबईत पैशांचं घबाड सापडलं असून पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्हॅनमध्ये 4 कोटी 70 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी पकडलीयं.
ज्यांना मीच तिकीट दिलंय अन् खासदारही केलंय, त्यांच्या आव्हानाला महत्व देत नसल्याचं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंचं आव्हान धुडकावलं आहे.
काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं, असं वादग्रस्त विधान महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केलं आहे.
शिरुरचा उमेदवार यांना खासदारकीमध्ये नाही तर अभिनयात रस असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पीडीसीसी बँकेवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.