‘वेदांता’ समूह आणि ‘फॉक्सकॉन’च्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पातून महाराष्ट्रात 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. पण हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक उद्योग, सरकारी कार्यलाये आणि प्रस्तावित प्रकल्प आयत्यावेळेला गुजरातला हलवण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रातून गुजरातला नक्की काय काय गेलं हे जाणूण घेऊया…
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जायचं की शिंदेंच्या.. यावर्षी राज्यात चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणारेत. हे चारही मेळावे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकरणावर प्रभाव पाडणारे आहेत. आता या दसरा मेळाव्याचं राजकारण नक्की काय आहे.. हे समजून घेऊया..
जगविख्यात फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक जीन-ल्यूक गोडार्ड यांनी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन कायदेशीर इच्छा मृत्यूचा आधार घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी इच्छा मृत्यूच्या पर्यायांवर राष्ट्रीय चर्चा करण्याची घोषणा करावी लागली. भारतात इच्छा मृत्यूचा कायदा काय सांगतो? आणि असाध्य आजार झालेल्या रुग्णांनी इच्छा मृत्यूचा पर्याय निवडणे योग्य आहे का? हे जाणून घेऊया…
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे नुकतच निधन झाले. मुलायम सिंह यादव यांच्या बाबतीत अनेक किस्से उत्तर प्रदेशाच्या राजकारणात प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा पट जेव्हा उघडला जातो त्यावेळी ‘मुलायम सिंह यादव, मयावती आणि गेस्ट हाउस प्रकरण’ याची चर्चा होते. हे प्रकरण समजून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा..
बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याची आणि अनेक वर्षांची मागणी असलेल्या अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी ‘डेमू रेल्वे’ सेवा सुरु झाली आहे. 261 किमी अंतराच्या या एकूण प्रकल्पापैकी अहमदनगर ते आष्टी या 67 किमी अंतरावर आजपासून डेमो रेल्वे धावण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्हावासीयांच्या स्वप्नपूर्तीकडे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
उद्धव ठाकरेंनी गोरेगावमध्ये गटप्रमुखांचा जाहीर मेळावा घेतला. ठाकरेंची गोरेगावमध्ये सभा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत राज्य प्रमुखांचा मेळावा घेऊन उध्दव ठाकरें प्रतिउत्तर दिलं. आता ह्या जाहीर मेळाव्यात कोण कोणाला भारी पडले हे पाहूया..