छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणी अमोल खोतकरच्या बहिणीच्या घरात 22 तोळे सोनं आणि जिवंत काडतूसे सापडल्याप्रकरणी रोहिणी खोतकरला अटक करण्यात आलीयं.
सोलापुरात वारीबाबत केलेल्या विधानावरुन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माफीनामा जाहीर केलायं. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.
मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको, हिंदी भाषेची सक्ती नको मात्र, हिंदी भाषा शिकणं महत्वाचं असल्याचं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलंय
रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे याने जामीनावर सुटताच मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलायं.
रेल्वेच्या नव्या धोरणानुसार तिकीटांच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा झटका बसणार आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं सोलापुरातील राहत्या घरी निधन झालं आहे.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलमधील 12 संचालक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे.
हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, या शब्दांत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना डिवचलंय.
कोल्हापुरातील मदरशामध्ये अल्पवयीन मुलाने सहकारी मित्राच्या तोंडात बोळा कोंबून, हातपाय वायरीने बांधून शॉक देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक केली असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर केलायं.