Budget 2024 : आगामी लोकसभा उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या असतानाच आता केंद्र सरकारकडून येत्या 1 फेब्रूवारीला यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetaraman) संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निवडणुकीचं वर्ष असल्याने सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना यंदाच्या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा असणार आहेत. त्यामुळे […]
Ahmednagar News : येणाऱ्या काळात निवडणुका होणार असल्याने आता राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांची व पदधिकाऱ्यांचे मेळावे तसेच बैठका घेतल्या जात आहे. यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पक्ष कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा येत्या 28 जानेवारी रोजी अहमदनगर शहरात पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे उपस्थित राहणार असून […]
Shirdi Loksabha : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. याचा शिर्डी लोकसभेसाठी देखील आता राजकीय पक्षांकडून चाचणी सुरू आहे दरम्यान आरपीआयचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavle) शिर्डी मतदारसंघातून लोकसभा लढवणारच, याबाबतची सर्व तयारी झाली असून निर्णय सुरू आहे अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिली. […]
Ayodhya Bjp leaders Sold Ecologically Sensitive land : अयोध्येत नूकताच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याआधीच अयोध्येत पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेली जमीन भाजपच्या नेत्यांनी अदानी समूहासोबत विकल्याची माहिती समोर आलीयं. यासंदर्भात स्क्रॉल डॉट इन वेबसाईटने माहिती दिलीयं. या रिपोर्टनूसार भाजपच्या नेत्यांनी संगनमताने राम मंदिराच्या जवळच असलेल्या या जमीनीचा व्यवहार केला असल्याचंही उघड झालं […]
Manoj Jarange On Prakash Ambedkar : आम्ही प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) सल्ला कधीही ऐकलेलाच आहे, आमची काहीही हरकत नसून त्यांचा सल्ला आम्ही ऐकणार असल्याचं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगेंनी (Manoj Jarange ) स्पष्टच सांगितलं आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा वाद उफाळणार असल्याची शक्यता असल्याने आंबेडकरांनी मी मध्यस्थी करत असल्याचं म्हटलं होतं. त्यावर बोलताना मनोज जरांगे […]
Prakash Ambedkar News : ओबीसी-मराठा वादात मी मध्यस्थी करतो, असं विधान करीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) ओबीसी-मराठा (Maratha-OBC) वादात उडी घेतली आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच रान पेटल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईला धडक घेणार असून दुसरीकडे ओबीसी नेते बबनराव तायडेंनीही रस्त्यावर उतरणार असल्याची […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर आता निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरु आहे. सुनावणीदरम्यान, आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान, शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या एका आमदाराच्या पाठिंब्याच्या पत्रावर आक्षेप घेतला आहे. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे अमेरिकेत असताना त्यांनी पत्रावर […]
Meera Road : अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या दिवशीच दोन गटांत तुफान राडा झाल्याची घटना घडली होती. मीरा रोड (Meera Road) परिसरातील नया नगर भागात ही घटना घडली. या घटनेनंतर आज स्थानिक प्रशासनाकडून रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्देशानंतर महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. #WATCH | Illegal structures and encroachments razed […]
Udhav Thackeray On Rahul Narvekar : राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) लबाडाला सांगा, हिंमत असेल तर इथं येऊन विचार शिवसेना कोणाची? असं खुलं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. या निकालावरुन उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये आयोजित जाहीर सभेतून […]
Udhav Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खुर्चीसाठी शेपूट हलवत असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. नाशिकमध्ये ठाकरेंनी आयोजित सभेतून पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोडच उठवली आहे. शेअर बाजारात हाहाकार! […]