पुणे : टिळक कुटुंबियांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडी निवडणूक लढणार नाही, असं असेल तर आम्ही टिळक कुटुंबियांनी उमेदवारी देण्यासाठी तयार असल्याचं मोठं विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bavankule) केलंय. तसेच हेमंत रासने यांनी दिलेली उमेदवारी आम्ही मागे घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बावनकुळे यांनी नूकतीच दिवंगत आमदार मुक्ता टिळक(Mukta tilak) कुटुंबियांची भेट घेतलीय. […]
अहमदनगर : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) तुम्ही काँग्रेस पक्षाची भूमिका सांगा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा, काही तरी एक सांगा, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe patil) यांनी ठणकावून सांगितलंय. राधाकृष्ण विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंबाबतचा विषय संपला कारण आता निवडणुकही […]
Adani Share News : मागील दिवसांपासून उद्योपती गौतम अदानी (Gautam Adani) अडचणीत सापडले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे गौतम अदानी यांच्या अदानी समूहाचे तारण शेअर्स (Adani Share News) सोडवण्यासाठी 1114 डॉलर्स अर्थात सुमारे 9 हजार कोटींचे प्री पेमेंट करणार आहेत. याबाबत कंपनीकडून एक निवेदन प्रसिध्द करण्यात आलं आहे. यामध्ये अदानी पोर्टस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी […]
नागपूर : एकीकडं अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरु असताना हिंदू परिषदेकडून अजब दावा करण्यात आला आहे. लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही, तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल, असा दावा हिंदू परिषदेचे प्रविण तोगडीया (Pravin Togdiya) यांनी केला आहे. प्रविण तोगडीया नागपूरात बोलतं होते. ते म्हणाले, देशात राम मंदिर निर्माण होत आहे. याचा आम्हाला आनंद […]
अहमदनगर : पुण्यापाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यातही कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला आहे. पारनेर तालुक्यातील सुप्यात एका पानाच्या दुकानाची तोडफोड करीत कोयता गॅंगच्या सदस्यांकडून एका जणाला गंभीर जखमी केल्याची घटना घडलीय. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. नेमकं प्रकरण काय? पारनेर तालुक्यातील सुपा येथे काल दि. 5 रोजी एका पान दुकानाची तोडफोड करत कोयता गँगने एकाला […]
पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात काही तरुणांकडून धुडगूस घालण्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील खेडमध्ये नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुणांनी धूडगुस घातल्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम काही वेळासाठी थांबिवण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान, डिजेच्या तालावर गौतमी पाटीलचं नृत्य सुरु झाल्यानंतर स्टेजच्याखाली उभे असलेल्या तरुणांनी एकच ठेका धरला होता. याच वेळी तरुणांनी […]
मुंबई : जे काही झालं आहे ते पक्षीय राजकारण असून मी माझं मत पक्षश्रेष्ठींना कळवलं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलीय. बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आपले भाचे सत्यजित तांबे यांच्या विजयावर त्यांचं अभिनंदनही केलंय. थोरात म्हणाले, मी गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात होतो. माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्याने मला कार्यकर्त्यांपासून […]
मुंबई : उद्योजक गौतम अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या प्रमुख मागणी उद्या मुंबईत प्रदेश काँग्रेसच्यावतीने एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थिती राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवल्याचा आरोप काँग्रेसकडून […]
मुंबई : मुंबईत उध्दव ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघातील माजी नगरसेविका मानसी दळवी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील झाल्या आहेत. वरळी मतदारसंघातील माजी नगरसेविका मानसी दळवी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे. प्रवेशादरम्यान त्यांनी हातात भगवा झेंडा घेतला आहे. मी […]
वर्धा : साहित्यिकांनी निर्भीडपणे आपले विचार मांडले पाहिजे, त्यांचा अधिकार राजकारण्यांनी मान्य केला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. गडकरी 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले, साहित्यिकांनी समाजाला जोडण्याचं काम केलं आहे. समाजाला चांगल्या दिशेने नेण्याचं काम केलंय. जे चांगलं आहे ते त्रिकालबाधित […]