सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशभरात विविध विचारांच्या लोकांचा जागर सुरु असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. यामध्ये देशातील पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ, राजस्थान राज्यांमध्ये सत्ताधारी सरकारविरोधात रणनीती आखली जात असल्याचं दिसून येतंय. देशातील विरोधी पक्षांची नेमकी दिशा काय? असा प्रश्न पडला असतानाच देशातील विरोधी पक्षांचे एक संमेलन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी […]
Ranji Trophy 2023 Vidarbha Cricket Team : रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2023) विदर्भ संघाकडून नवा इतिहास रचण्यात आलाय. गुजरातविरुध्दच्या सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करीत विदर्भ संघाने एक नवा विक्रम केलाय. विदर्भ संघाने दिलेल्या 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग गुजरात संघ करु शकला नसून गुजरात संघ अवघ्या 54 धावांत सर्वबाद झाला. गुजरातला 17 धावांनी सामना गमवावा लागला […]
अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयात काल दुपारच्या दरम्यान दोन गटांत वाद झाल्याची घटना घडली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीत म्हंटलं की, अहमदनगर महाविद्यालयात शिकत असलेल्या करण पाटील नामक विद्यार्थी त्याच्या मित्रांसह महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठीचं निवेदन देण्यासाठी प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात होता. पाटील प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात असतानाच […]
मुंबई : सरकारी बंगल्यात रिल्स स्टार रियाझ अलीसोबत(RiyaazAli) अमृता फडणवीसांनी(AmrutaFadnvis) रिल्स बनवल्याने सध्या सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. सरकारी बंगल्यात रिल्स बनवल्याप्रकरणी अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादात सापडल्याचं दिसून येतंय. हा व्हिडिओ सरकारी बंगल्यात केला असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या हेमा पिंगळे यांनी केलाय. अमृता फडणवीस यांनी रियाझ अलीसोबत ‘आज मैं मूड बना लीया’ या […]
मुंबई : 25 वर्षांपासून शिवसेनेसोबत असलेला भाजप नामानिराळा कसा काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत विविध विकास कामांचं उद्घाटन करताना विरोधकांवर टीका केलीय. त्यानंतर नाना पटोलेंनी सवाल उपस्थित करीत प्रत्युत्तर दिलंय. यावेळी नाना पटोलेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. पुढे बोलताना पटोले म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत २५ […]
मुंबई : मुंबईकरांना माझा नमस्कार… माझ्या बंधू आणि भगिनींनो, असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पणाच्या कार्यक्रमात भाषणाला मराठीतून सुरुवात केलीय. पंतप्रधान मोदींनी जेव्हा मराठीतून सुरुवात केली तेव्हा उपस्थितांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत केल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय. पंतप्रधान […]
मुंबई : राज्यात डबल इंजिन सरकार नव्हतं तेव्हा विकासासाठी अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांनी लगावला आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर भारत देश पहिल्यांदाच विकासाचं स्वप्न पाहत असल्याचंही ते म्हणालेत. मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान […]
हैदराबाद : भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 धावाने पराभव केला. गिलच्या 208 धावांच्या जोरावर भारताने 349 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत न्यूझीलंडने सर्वबाद 337 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सर्वाधिक मायकल ब्रेसवेलने 78 चेंडूंत 140 धावा करत […]
अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्हिडिओ कॉलद्वारे नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस केली आहे. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील अपघातात जखमी झालेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केलीय. नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला […]
अहमदनगर : काँग्रेसमधला शेवटचा तरुण म्हणजे राहुल गांधी असल्याची खोचक टीका नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील(sujayvikhepatil) यांनी केलीय. यावेळी त्यांनी राहुल गांधी (rahulgandhi) यांच्यासह काँग्रेस (Congress) पक्षावर सडकून टीका केलीय. ते अहमदनगर शहरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. विखे पुढे बोलताना म्हणाले, मी काँग्रेस पक्षामध्ये असताना पाहिलंय की, काँग्रेसचे नेते आपली आपली […]