“जे सरकार कलम 370 हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर कायमचा भगवा लावण्यास परवानगी देईल का? असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत शिवनेरी गडावरील प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते. पुरातत्व खात्याच्या नियमांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज फडकवला जात नाही. याचा […]
औरंगाबाद : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे यांना ठाण्यातून देखील निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. पण आदित्य ठाकरे यांची ही दोन्ही चॅलेंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली नाही, त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]
अहमदनगर : निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (Nivritti Maharaj Deshmukh Indorikar) यांचे कीर्तन ऐकण्यासारखे असते. समाजात काही दोष निर्माण होत असतात. त्यावर आपल्या शैलीने ते आघात करीत असतात. ते दोष दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. समाजाचं प्रबोधन करणारे त्यांच व्यक्तिमत्व आहे. माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने मला कीर्तनासाठी उपस्थित राहता आले नाही, अशी खंत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची काल शिवसेना (Shiv Sena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात सभा झाली. या सभेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा दिसत आहे. कारण, या सभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या नेतेमंडळींनी भाषणांमधून जोरदार टोलेबाजी केली. शिवाय या सभेत शिंदे गट आणि भाजपा शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं बोललं गेलं […]
काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात( Balasaheb Thorat) यांनी आपल्या विधीमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावरुन अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाळासाहेब थोरात हे मनातून दुखावल्याने त्यांनी राजनीमा दिला असेल, असे राऊतांनी म्हटले […]
कॅलिफोर्निया : अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया (California’) या राज्यातील सॅन होजे (San Jose) शहरातील एका उद्यानात असलेला छत्रपती शिवाजी महाराज (Shri Shivaji Maharaj Statue Stolen) यांचा पुतळा चोरीस गेला आहे. ‘सिस्टर सिटी’ मोहिमेंतर्गत सॅन होजे आणि पुण्याचे संबंध प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे शहराने हा पुतळा सॅन होजेला भेट दिला होता. अमेरिकेतील शिवाजी महाराज्यांच्या एकमेव […]
पुणे : ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) धमकीचा फोन आला असून त्याने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) लेखी तक्रार दाखल केली. कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना धमकीचा फोन आल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला. या धमकीनंतर आता तात्काळ संरक्षण देण्याची मागणी अभिजीत बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे केली. तक्रार दाखल करत अभिजीत बिचुकलेने […]
मुंबई : देशातील महागाईचा दर खाली आल्यानंतरही रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग सहाव्यांदा रेपो रेट वाढवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर रेपो रेट 6.25% वरून 6.50% झाला आहे. त्यामुळे घर कर्जापासून ते वाहन आणि वैयक्तिक कर्जापर्यंत सर्व काही महाग होईल. परिणामी सर्वसामान्य लोकांना जास्त ईएमआय भरावा लागेल. देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आरबीआय एमपीसीची ही बैठक […]
मुंबई : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जाहीर आव्हान दिले. त्यांनतर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीमधील कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात होते. या दोघांचा कोळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात सभा घेतली. यावरुन आदित्य ठाकरेंनी वरळीत तुम्हाला गल्लीगल्लीत फिरायला लावेल, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गल्लीत फिरण्याची लाज वाटत असेल तर राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका […]