Prithvi Shaw : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने इंग्लंडच्या नॉर्थहॅम्प्टनमधील काउंटी ग्राउंडवर शानदार द्विशतक ठोकले आहे. नॉर्थम्प्टनशायरसाठी तिसऱ्या सामन्यात सलामी येताना पृथ्वी शॉने 81 चेंडूंमध्ये (14 चौकार, 2 षटकार) शतक झळकावले. पृथ्वी शॉने 129 व्या चेंडूवर द्विशतक पूर्ण केले. त्याने आपल्या द्विशतकात 24 चौकार आणि 8 षटकार ठोकले. पृथ्वी शॉने लिस्ट ए क्रिकेटमध्येही विक्रमांचा पाऊस […]
Manipur Violence: मणिपूरमधील परिस्थितीजन्य वांशिक हिंसाचार आहे. याला राजकीय मुद्दा बनवू नका. मणिपूरची स्थिती जाणून घेण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी मला पहाटे 4 वाजता फोन केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता झोपेतून उठवलं. विरोधक म्हणतात की मोदीचं मणिपूरडे लक्ष नाही. तीन दिवस आम्ही इथून सतत काम केले. 16 व्हिडिओ कॉन्फरन्स केल्या, 36,000 जवान पाठवले. मुख्य सचिव […]
Pakistan Interim PM: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आज राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची औपचारिक शिफारस करणार आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 12 ऑगस्ट रोजी संपत आहे. एआयवाय न्यूज, डेली पाकिस्तान आणि पाकिस्तान ऑब्झर्व्हरच्या वृत्तानुसार, शेहबाज शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर जलील अब्बास जिलानी काळजीवाहू पंतप्रधान होऊ शकतात. जलील अब्बास जिलानी हे पंतप्रधान […]
Amit Shah on Rahul Gandhi : नरेंद्र मोदींनी 2014 पासून 2023 पर्यंतच्या 9 वर्षात नव्या राजकीय युगाची सुरुवात केली. गेल्या तीस वर्षात देशाचे राजकारण भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाने नासावले होते. अशा राजकारणाला कंटाळलेल्या जनतेने मोदींना जनादेश दिला. भारताच्या लोकशाहीला या तीन भस्मासूरांनी घेरलं होतं. नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण संपवून गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे, […]
Gmail Translation Feature: Google ची ईमेल सेवा Gmail ही जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी ईमेल सेवा आहे. आता Google ने Gmail अॅपमध्ये एक नवीन फीचर जारी केले आहे. याद्वारे यूजर्स संपूर्ण ईमेलचे भाषांतर करू शकणार आहेत. याआधी हे फीचर फक्त वेब व्हर्जनवर उपलब्ध होते. पण आता कंपनीने Gmail च्या Android आणि iOS अॅप्सवरही हे फीचर आणण्यास […]
Kiran Mane Post: आपल्या धमाल विनोदांनी आणि हटक्या अभिनयाने फक्त मराठीच नव्हे, तर हिंदी सिनेमा सृष्टी देखील दणाणून सोडलेले अभिनेते म्हणजे दादा कोंडके (Dada Kondke). दादा कोंडके यांचा सिनेमा प्रदर्शित होणार असे म्हटले की, बॉलिवूडमधील अनेक निर्मात्यांची छाती भारावून यायची. दादा कोंडके यांची येत्या ८ ऑगस्टला ९१ वी जयंती होती. त्यानिमित्ताने झी टॉकीजवर “ज्युबिली स्टार […]
Nagpur news : नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन पुकारले आहे. संविधान चौकापासून फडणवीसांच्या घरापर्यंत हा लॉग मार्च काढण्यात आला आहे. लॉग मार्चमुळे विदर्भवाद्यांची संविधान चौकात मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. वेगळ्या विदर्भासह अनेक मागण्या या मोर्चामधून करण्यात येत आहेत. वेगळ्या विदर्भासाठी मोर्चेकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी फडणवीसांच्या घरासमोर बॅरिकेट लावले आहेत. […]
Territory Teaser Out: विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची (Territory Marathi Movie) थरारक कहाणी असणारा बहुचर्चित ‘टेरिटरी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात येणार आहे. सचिन श्रीराम दिग्दर्शित या सिनेमात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. येत्या १ सप्टेंबरला हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील […]
Imran Khan arrest : तोशाखान्यात (सरकारी खजिन्यात) ठेवलेल्या भेटवस्तूंचा पाकिस्तान सरकार लिलाव करणार आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. या भेटवस्तूंच्या लिलावातून जमा होणारी रक्कम गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इम्रान खान यांनी […]
Kangana Ranaut Vs Javed Akhtar: मुंबईच्या अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने प्रसिद्ध कवी-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या अर्जावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतकडून ( Kangana Ranaut) उत्तर मागितल्याचे सांगितले जात आहे. यात त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाने जारी केलेल्या समन्सच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. कंगनाने दाखल केलेल्या खटल्यामध्ये जावेद अख्तर यांना दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावल्याचे सांगितले जात […]