- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
न्यूझीलंड दौऱ्यासाठी श्रीलंकेने जाहीर केला कसोटी संघ
मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघ 9 मार्चपासून न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका महत्वाची असणार आहे. खरं तर, भारत आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीच्या शर्यतीत फक्त […]
-
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत भर पडल्याची एक घटना घडली आहे. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 40 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेत त्यांची 40 कोटींची फसवणूक केली, असा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. कोल्हापुरातील मुरगुड पोलिस ठाण्यात […]
-
ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…तर बापट घरी कसे बसतील
मुंबई : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) मतदार संघातील पोट निवडणुक भाजप व महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली. यातच प्रकृती अस्वस्थ असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांना देखील भाजपने प्रचारात उतरवले. ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घेऊन गिरीश बापट प्रचारासाठी हजर झाले. मात्र यावरून विरोधकांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली. यावर […]
-
Accident : मध्यप्रदेशात बसचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्य तर…
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यात भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. भरधाव ट्रकने तीन बसला टक्कर दिल्याने झालेल्या अपघातात 13 जण ठार तर 50 हुन अधिकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमींमधील 15-20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी […]
-
नामांतर शहराचं की जिल्ह्याचे? दानवेंच्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर
मुंबई : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) तर उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) नामकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. पण या नावावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्विटद्वारे सरकारला सवाल केला. दानवे यांच्या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, औरंगाबादचे नाव […]
-
अंजीर खाल्ल्यास शरीराला होतात हे फायदे
मुंबई : धावपळीच्या या जीवनात पुरुषांच्या जबाबदाऱ्यामध्ये वाढ होत असते. वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे आपण कधी कधी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. यासाठी निरोगी आहार घेणे फार महत्वाचे आहे, अन्यथा पुरुषांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. म्हणूनच पुरुषांनी दररोज अंजीर खावीत यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. अंजीर खाल्ल्याने पुरुषांना काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेऊ […]
-
Hindenburg Report : अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका, हिंडेनबर्ग प्रकरणी मीडियाला…
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत भर पडताना दिसून येत आहे. यातच आता अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाने जोरदार धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवालाच्या मीडिया कव्हरेजवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका देखील कोर्टाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले की, आम्ही माध्यमांवर बंदी घालू […]
-
अक्षय कुमार कॅनडाचे नागरिकत्व सोडून होणार भारतीय…
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आजकालच्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा सेल्फी हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, अक्षयने एका मुलाखतीच्या वेळी आपल्या कॅनेडियन नागरिकत्वाबद्दल उघडपणे आपलं मत व्यक्त केलं आहे. भारत देश हाच माझ्यासाठी सर्व काही आहे आणि लवकरच मी कॅनेडियन नागरिकत्व सोडून देईल, असं […]
-
मनसेला खिंडार ! निवडणुकांच्या तोंडावर 50 मनसैनिकांनी दिले राजीनामे
पुणे : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यातच आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. मनसेने (MNS) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी मविआच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आलीये. मनसेच्या 7 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याने त्यापाठोपाठ 50 मनसैनिकांनी आपले राजीनामी दिले आहे. […]
-
Pune Bypoll Election : पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस
पुणे : कसबा (Kasba Bypoll Election) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll Election) विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा (Election Campaign) आजच (24 फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर कुठलाही प्रचार करता येणार नाहीये. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने सर्वच पक्ष प्रचाराच्या मैदानात ताकदीने उतरत आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि […]









