Samudrayaan Mission : चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 च्या यशानंतर भारत आता सागर मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्त्रोने अंतराळाचा मोहीम फत्ते केल्यानंतर भारत समुद्राच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. समुद्रयान प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या मदतीने मानवाला समुद्रात 6 हजार मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरु आहे. या मोहिमेच्या यशामुळे […]
Selling Scrap : केंद्र सरकारने आपल्या सर्व कार्यालयांमधील जुन्या फाईल्स, जुन्या वस्तू, पेपर, रद्दी, जुनी वाहनं विकून तब्बल 600 कोटी रुपये कमावले आहेत. ऑगस्टपासून अर्थात अवघ्या दीड महिन्यामध्येच केंद्र सरकारने 600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही कमाई 1 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने आत्तापर्यंत भंगारातून […]
CM Eknath Shinde : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन जनतेच्या दारी येतोय. लोकांना शासकीय योजनांचा लाभ देतोय. हे पाहून अनेक लोकांना पोटदुखी सुटलेली आहे. पोटाचा आजार झालेला आहे. त्यामुळे या पोटदुखीवर आम्ही लवकरच डॉक्टर आपल्या दारी कार्यक्रम सुरु करणार असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा […]
Girish Mahajan On Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनावरही निशाणा साधला. ते म्हणाले. सामना पेपर आता फक्त पुसायच्या कामापुरता राहिला आहे. कोण वाचतं सामना पेपर? सामनाला आपण का एवढं महत्व देतो? लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाने एक उमेदवार निवडून आणून […]
Vijay Wadettiwar On Dhananjay Munde : राज्य सरकार सुस्त आणि मंत्री मस्त अशी अवस्था राज्यात झाली आहे. मंत्र्यांचं लक्ष शेतकऱ्यांकडे नाही.संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळाच्या गडद छायेत आहे. सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यात 186 बीड जिल्ह्यातील शेतकरी आहेत आणि मंत्री उत्तरदायी सभा करत आहात. शेतकऱ्यांचे जीव घेण्यासाठी कृषिमंत्रिपद दिले का? […]
Balasaheb Thorat On Pm Modi : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेत माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आमदार थोरात म्हणाले की, जो भाजपच्या विरोधात जाईल त्याला लगेच ईडी लावायची. त्याचवेळी इस्त्रोचं यान विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरत होतं, त्यावेळी पंतप्रधान मोदींना स्क्रीनवर दाखवले जात होते, त्यावरुन आमदार थोरात […]
Ahmednagar : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी तसेच शहरातील स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगाने थेट नगरकरांशी संवाद साधण्यासाठी रविवारी जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कॉंग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आगामी निवडणुका पाहता, या यात्रेला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या […]
Ajit Pawar On baramati Teachers : पुण्यामध्ये आज शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्याचवेळी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. त्यात सर्वाधिक शिरुर तालुक्यातील विद्यार्थी आहेत तर बारामती तालुक्यातील एकही विद्यार्थी गुणवत्ता […]
Malhar sena Aggressive On Radhakrishna Vikhe : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आरक्षणासाठी शेखर बंगाळे यांनी भंडारा टाकला. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शेखर बंगाळे यांना मारहाण केली. त्यामुळे धनगर संघटना आक्रमक झाल्या आहेत. जालन्यातील अंबड तहसील कार्यालयासमोर मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज निषेध करण्यात आला. त्याचबरोबर आता महसूल […]