Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर जाण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठाम आहेत. याशिवाय या कार्यक्रमात पवार यांनी सहभागी होऊ नये, अशी मागणी करणाऱ्या शिष्टमंडळाला भेटण्यासही त्यांनी नकार दिला असल्याची माहिती आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पवार यांना भेटायला जाणार होते. दरम्यान, पवार यांच्या […]
Prakash Ambedkar On Sambhaji Bhide : महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार आंदोलनं सुरु आहेत. त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर चांगलेच संतापले आहेत. यापूर्वीच नको ते बोलणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई झाली असती तर भिडे महात्मा गांधींवर आता […]
K.Chandrashekhar Rao : अनेक महिन्यांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चेंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रातील राजकीय दौरे वाढले आहेत. केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी एक प्रकारे धास्तीच घेतली आहे. केसीआर यांच्या दौऱ्यांवरुन विविध पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उद्या (दि.1) पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. गतवेळी आषाढी एकादशीचे औचित्य […]
Uddhav Thackeray on Eknath shinde : शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून ठाकरे गटातील अनेक शिवसैनिकांना फोडून आपल्या बाजूला घेतले. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आज मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपला एकप्रकारे आभार मानले आणि सांगितले की, दर आठवड्याला आमच्यातला माणूस फोडा, त्यामुळे बिनकामाची माणसं […]
Atul Londhe On Deepak Kesarkar : काँग्रेसला विरोधी पक्षनेता निवडता येत नाही ते देश काय चालवणार? हे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे विधान बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश चालवता येत नाही त्याचसोबत एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र चालवत येत नाही, हे जनतेला समजले आहे. काँग्रेसने 60 वर्षांपेक्षा जास्त केंद्रातील व विविध राज्यात सरकार […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली अध्यादेशाविरोधातील भूमिकेबाबत संभ्रम वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कारण हे विधेयक येत्या सोमवारी किंवा मंगळवारी संसदेच्या पटलावर मांडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता ज्या दिवशी हे विधेयक मांडले जाईल, त्या दिवशी शरद पवार राज्यसभेत उपस्थित राहणार की नाही याबद्दल संभ्रम वाढला आहे. पवारांच्या उपस्थितीबद्दल संभ्रम निर्माण […]
Govt. Schemes : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेंतर्गत प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजून कुटुंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करुन देण्यात येते. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज तर 50 टक्के रक्कम अनुदान स्वरुपात देण्यात येते.(Govt schemes Karmaveer Dadasaheb Gaikwad empowerment and self-respect scheme) ‘मतासाठी कोणतीही […]
Maharashtra Monsoon Session : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विविध मुद्द्यांवरुन शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून हे पावसाळी अधिवेशन लवकरच गुंडाळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. आता मात्र पावसाळी अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी […]
Shirur News : शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील महिला शेतकरी लताबाई भास्कर हिंगे यांनी एक आगळीवेगळी मागणी केली आहे. या महिला शेतकऱ्याने आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने तहसिलदारांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. त्यानंतर महिला शेतकऱ्याच्या या मागणीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.(Pune shirur Women farmers demand Give the helicopter to go to […]
Sadabhau Khot : महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या निवेदनामध्ये राज्यातील काही खासगी दूध संघांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अक्षरशः दरोडा टाकण्याचं काम सुरु असल्याचे निवेदनात म्हटले आहे.(Sadabhau Khot criticize On private milk unions […]