Ajit Pawar : महाराष्ट्रामध्ये प्रश्न अनेक आहेत, विरोधी पक्षात राहून जास्त काही कामं मार्गी लागत नाहीत. मी 30 वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये विरोधी तसेच सत्ताधारी पक्षात काम केले. सत्तेचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो, अशी आम्हाला शिकवण आहे. त्यामध्ये शाहु, फुलेंच्या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी हे महायुतीचं सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. […]
Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदिपान भूमरे यांच्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते भिडल्याचे पाहायला मिळाले. या नेत्याच्या जोरदार राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा […]
World Archery Championships : साताऱ्याची अदिती गोपीचंद स्वामी हिने बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णवेध घेतला आहे. साताऱ्यातील अदितीने तिरंदाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीमध्ये अदितीने मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला 149-147 ने हरवून विश्वविजेता बनली आहे.(World Archery Championships aditi Swami NEW world champion satara ) “जसं मांजरी पिल्लांना खाते, […]
CM Eknath Shinde In Jejuri : पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात […]
Sujay Vikhe On Law of Love Jihad : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चार्चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू माता भगिनींवरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव्ह जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज आहे. अशा जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खा. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तसेच लव्ह जिहादचा कायदा संसदेत आणण्यासाठी […]
Nitesh Rane : सकल हिंदू समाजाच्या वतीने आज अहमदनगरमधील राहुरी येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील सहभाग घेतला. या मोर्चाला नितेश राणे यांनी संबोधित केले. यावेळी राणे यांनी सांगितले की, लवकरच राज्यात […]
Nana Patole On INDIA Meeting : भाजपविरोधात देशामध्ये उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईमध्ये होणार आहे. मुंबईमध्ये होणारी ‘इंडिया’ची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशी दोन दिवस चालणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंडियाच्या बैठकीचे […]
Devendra Fadnavis On MVA : महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पहिले आपापले पक्ष एकसंघ ठेवावेत, त्यानंतर तीन पक्षांची मूठ बांधावी अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आले असता त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.(nagpur Devendra Fadnavis criticize on Mahavikas Aghadi shivsena thackeray group congress NCP) ‘आता मंत्रिमंडळ […]
India vs West Indies 1st T20 Score Update : वेस्ट इंडिजचा संघ ट्वेंटी-20 मध्ये काय कमाल करुन दाखवू शकतो याची प्रचिती आली आहे. ब्रेंडन किंग, रोव्हमन पॉवेल व निकोलस पूरन यांनी दमदार फटकेबाजी केली. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली मात्र त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी या सामन्यात जोरदार कमबॅक केल्याचेही पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून […]
Pune : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन विभाग या दोन विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजना 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्याकरिता केंद्र शासनाने सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या […]