नवी दिल्ली : देशातील वातावरण सातत्यानं बदलताना दिसतंय. कुठे थंडी तर ढगाळ वातावरण जाणवतंय. सध्या उत्तर भारत चांगलाच गारठलाय. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांसाठी थंडीचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद […]
नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात वातावरणात सातत्यानं बदलत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक असल्याचं दिसून येतंय. देशाची राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका वाढलाय. दिल्लीमध्ये तापमानाचा पारा 3 अंशावर गेला आहे. एकीकडं थंडी तर दुसरीकडं धुक्याची चादर पसरलीय. दिल्लीत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय. थंडीमुळं तेथील […]
जवळपास एक वर्षांपासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेनमधील युध्द अखेर थांबण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युद्ध थांबवण्यासाठी चर्चेची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, पुतीन यांनी युध्द थांबविण्याची तयारी दाखवली असून काही अटीही घातल्या आहेत. यासंदर्भात रशियाच्या सरकारकडून माहिती देण्यात आलीय. विविध कारणांमुळे रशियाने युक्रेनवर लष्करी हल्ला चढविला. त्यांनंतर युक्रेन गुडघे टेकणार अशी […]
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी मतदानापूर्वी शपथविधी सुरू होताच गोंधळ उडाला. यावेळी ‘आप’ आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि खुर्च्या देखील फेकझोक झाली. या भांडणात दोन्ही बाजूचे काही नगरसेवक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली महानगरपालिकेच्या नागरी केंद्रात सकाळी […]
नवी दिल्ली : जवळपास 200 दशलक्षपेक्षा अधिक ट्विटर वापरकर्त्यांचा डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा दावा एका रिपोर्टमधून करण्यात आला असून सुरक्षा संशोधनाच्या अहवालानूसार 200 दशलक्षपेक्षा अधिक वापरकर्त्यांचा डेटा चोरीला गेलाय. याबाबत अधिक माहिती अशी की, युजर्सच्या मोबाईलमधून ईमेल आयडी चोरुन एका ऑनलाईन फोरममध्ये पोस्ट केले आहेत. ब्रीच-नोटिफिकेशन साईट हॅव आय बीन […]
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, त्याचे केंद्र अफगाणिस्तानमधील फैजाबाद होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 होती आणि ती संध्याकाळी 7.55 वाजता आली. सध्या कोठूनही कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची माहिती नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, फरिदाबाद आणि गुरुग्राममध्ये लोकांना […]