टेस्लाचं वाय मॉडेल लॉन्च! भारतात किती असणार किंमत? जाणून घ्या सर्व काही…

Tesla Model Y launched In India How much cost features and price : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल बाजार आहे. त्यात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री तेजीने वाढली आहे. जूनमध्ये इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री 13,178 यूनिट्स झाली. तर ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची भागीदारी 4.4% वर गेली आहे. हे पाहता एलन मस्क यांची बहुचर्चित कंपनी टेस्ला इलेक्ट्रिक वाहन कंपनी भारतात येत आहे. मुंबईतील बीकेसी म्हणजे बॉम्बे -कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्लाचं शोरूम खुलं होत आहे. पण या गाड्यांची किंमत काय असणार? तसेच याबाबत सर्व काही जाणून घ्या…
मुंबईत सुरू झालं भारतातील पहिलं टेस्ला शोरूम; नावाच्या पाटीत ‘मराठी’ला प्राधान्य
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यांमध्ये भारतात 10 लाख डॉलरहून अधिक इलेक्ट्रिक वाहन, चार्जर्स आणि अॅक्सेसेरीज आयात केल्या गेल्या आहेत. चीन आणि अमेरिकेतून हे सर्व आयात केलं गेलं आहे. यामध्ये टेस्लाच्या बेस्ट सेलिंग कारच्या वाय मॉडेलचा देखील समावेश आहे.
मेटाची मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी Facebook Account बंद; कारणही धक्कादायक
टेस्लाची कार महाग का?
आता टेस्लाच्या बेस्ट सेलिंग कारचं वाय मॉडेल हे खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र जास्त इंपोर्ट ड्युटीमुळे या कारची किंमत चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत जास्त असणार आहे. तर आयातीमुळे कंपनीला 70 टक्के इंपोर्ट ड्युटी आणि इतर कर भरावे लागणार आहेत. त्यावर कंपनीचे मालक एलन मस्क यांनी नाराजी व्यक्त केली होती.
लव्ह स्टोरी, लग्न अन् लॅव्हिश लाईफ; अमिताभ-जया पॉवर कपलचा खास प्रवास…
टेस्लाची कारची भारतात किंमत किती?
टेस्लाची वाय मॉडेल कार एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रीक क्रॉस ओव्हर एसयुव्ही आहे. दिसायला अत्यंत सुंदर तर आहेच तिचे फिचर्स देखील खास आहेत. अहवालानुसार या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 27 लाखांहून अधिमक असणार आहे. ही किंमत विना इंपोर्ट ड्युटी आहे. त्यामुळे इंपोर्ट ड्युटी आणि इतर कर असे 21 लाख सरकारला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना ही कार तब्बल 48 लाखांना मिळू शकते. तर कंपनीच्या वेबसाईटवर कारच्या भारतातील किंमती देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या कार्स जवळपास 60 लाखांपासून सुरू होणार आहेत. यातील रियर-व्हील ड्राइव मॉडेलची किंमत 59.89 लाखांच्या आसपास सांगितली जात आहे. तर ही कार ऑन रोड 61.07 लाखांना असेल. याच मॉडेलमध्ये रेड व्हेरिएंटमध्ये लॉन्ग रेंज रियर-व्हील ड्राइवची किंमत 68.14 लाखांच्या आसपास सांगितली जात आहे. तर ही कार ऑन रोड 71.02 लाखांना असेल.
जळगावात राजकीय भूकंप! 13 नगरसेवकांनी सोडली ठाकरेंची साथ; भाजपप्रवेश ठरला पण..
तर टेस्लाचे इतर मॉडेलबद्दल सांगायचं झालं तर मॉडेल एस 2012 मध्ये लॉन्च झालं होतं. लग्जरी सेडान कारने एलीट क्लासमध्ये स्थान निर्माण केलं आहे. मॉडेल एक्स 2015 मध्ये लॉन्च झालं होतं. ही फॅमिली एसयुव्ही कार असून त्यात फाल्कन विंग डोर्स आणि हायटेक इंटेरिअर आहे. मॉडेल 3 2017 मध्ये लॉन्च झालं होतं. कंपनीने त्यांच्या या कारला स्वस्त कार म्हटलं होतं. त्यामुळे मध्यम वर्गाने टेस्ला कारचे स्वप्न पाहायला सुरू केले. त्यानंतर आता आलेल्या मॉडेल वाय 2020 मध्ये लॉन्च झालं आहे. कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार असून ही कार तेजीने प्रसिद्ध झाली.
10 वर्षांच्या प्रयत्नांना यश :
2016 मध्ये टेस्लाने मॉडेल 3 साठी प्री- ऑर्डर घ्यायला सुरूवात केली. ज्यावरून कंपनीचा भारतीय बाजारातील इंटरेस्ट दिसून आला. तर 2025 मध्ये कंपनीने या बुकींगचं रिफंड देखील केलं. त्यानंतर 2017 ला टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी आलिशान वाहनांवरील 100 टक्के आयात शुल्क ही टेस्लासाठी मोठी अडचण असल्याचं म्हटलं. 2021 मध्ये टेस्लाने बंगळुरूमध्ये त्यांच्या युनिटची नोंदणी केली. त्यावर मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, टेस्ला सीबीयूच्या माध्यमातून काम सुरू करेल. त्यानंतर 2022 मध्ये मस्क यांनी भारताच्या उच्च आयात शुल्काला पुन्हा अडचण म्हटले. पण टेस्लाने भारतात आपल्या चार मॉडेल्ससाठी होमोलोगेशन प्रक्रिया सुरू केली.
गुगलवरुन मिळवला बँकेचा कस्टमर केअर नंबर, कॉल करताच लाखो रुपये बुडाले; सायबर फ्रॉडची धक्कादायक स्टोरी
2023 मध्ये टेस्लाने मुंबईत 13 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. गुजरात आणि महाराष्ट्रात 2 बिलियन डॉलरच्या फॅक्ट्रीच्या योजनेचा विचार केला. पण सर्वाधिक टॅरिफ आणि स्थानिक दबावामुळे ही प्रक्रिया थांबली. मार्च 2024 मध्ये भारताने नवं ईव्ही धोरणाची घोषणा केली. त्यामध्ये काही अटींसह 35 हजार डॉलरहून अधिकच्या किंमतीच्या ईव्हीवरील आयात शुल्क घटवून 15 टक्के करण्यात आले. 2025 मध्ये टेस्लाने मुंबई आणि दिल्लीमध्ये स्टोअर मॅनेजर, विक्री आणि सर्व्हिस पदांसाठी भरतीमध्ये गती आणली आणि रिटेल ऑपरेशनचा पाया मजबूत झाला. तर याच वर्षी नव्या ईव्ही धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात आलं आणि रजिस्ट्रेशन विंडो ओपन करण्यात आली. यामध्ये टेस्लासह इतर ईव्ही कंपन्या देखील भारतात आल्या आहेत. त्यात आता जुलै 2025 मध्ये मुंबईत टेस्लाचं शोरून खुलं होतं आहे. त्यामध्ये चीन आणि अमेरिकेतून आयात केलेल्या कार्स विकल्या जातील.
काय सांगता! फक्त 27 धावांवर विंडीज ऑलआउट, 129 वर्षांचं रेकॉर्डही मोडलं; ऑस्ट्रेलिया विजयी