भाजपला आलेली सत्तेची गुर्मी उतरवा, बीडच्या प्रचारसभेत पवारांचे आवाहन
Sharad Pawar on PM Modi : मोदी सरकारला आलेली सत्तेची गुर्मी उतरवा, असं आवाहन बीड येथील प्रचार सभेत शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं. मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे, अशा शेतकरी विरोधी सरकारला हिसका दाखण्याची हीच वेळ आहे असं म्हणत उद्याच्या निवडणुकीत शेतकरीपुत्र बजरंग सोनवणेंना (Bajrang Sonwane) विजयी करा, असं आवाहन पवारांनी केलं.
दमदाटी आणि गुंडगिरी करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाणार; विखेंचा लंकेंना इशारा
आज बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज सभा झाली. या सभेला संबोधित करतांना शरद पवार म्हणाले की, बीड हा अतिशय दिलदार लोकांचा जिल्हा आहे. क्रांतीसिंह नाना पाटील यांना या जिल्ह्याने एकदा विजयी केले. नाना पाटील हे सातारा जिल्ह्यातील होते. उभे राहिले बीड जिल्हात. या जिल्ह्यातील जनतेने त्यांना निवडून दिलं. बीड जिल्ह्यात आमचेही सर्व आमदार निवडून आले. त्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि आठ दिवसांत 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. याचा फायदा देशातील सर्व राज्यांना झाला. ही कर्जमाफी संबंध देशातील लोकांना मिळाली. आज काय स्थिती आहे?, असा सवाल पवारांनी केला.
क्रिकेट लीजेंड जेम्स अँडरसन घेणार निवृत्ती, ‘या’ संघाविरुद्ध खेळणार शेवटचा सामना
पवार म्हणाले, मोदी सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे प्रेम नाटकी आहे. त्यांनी कधी कर्जमाफी केली नाही. व्याजदर कमी केले नाहीत, शेतमालाला भाव दिला नाही. मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. आता त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. मोदी जिथे जायचे होते तिथे गेले नाहीत. मात्र प्रचारासाठी ते एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात फिरत आहेत. मणिपूर जळत होते. आजी-बहिणींची इज्जत चव्हाट्यावर आली होती. त्यांनी तिथे जाऊन मणिपूरच्या जनतेला आधार देण्याचे काम करायला हवे होते. मात्र, मोदी त्या ठिकाणी गेले नाहीत, असं पवार म्हणाले.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत शेतकरी, महिला, नोकरदार आणि गरीबांवर अन्याय करण्य़ाचं काम केलं. या सरकारना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कधीही आस्था वाटली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचा हिसका काय असतो हे या सरकारला दाखवून द्या, असं आवाहन पवारांनी केलं.
देशाच्या पंतप्रधानांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. केवळ मोदींवर टीका केल्यानं सरकारने ही अटक केली. सत्तेचा दुरुपयोग आणि सत्तेची गुर्मी हेच धोरण मोदी सरकारचे आहे, असंही पवार म्हणाले.