मविआत कॉंग्रेसचे सॅंडवीच, ते मोदींना अंगावर घेऊ शकत नाही; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र

मविआत कॉंग्रेसचे सॅंडवीच, ते मोदींना अंगावर घेऊ शकत नाही; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र

Prakash Ambedkar Satara PC : शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये (UBT) काँग्रेसचा (Congress) सॅंडवीच झाला आहे. स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेसची संघटनात्मक पातळीवर घसरण होत आहे. तो पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) अंगावर घेऊ शकत नाही, अशा काँग्रेस पक्षाला आम्ही सहकाऱ्याचा हात देऊ, असं स्पष्ट करून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर आहेत, त्यांना फक्त राज्यपालपद कधी मिळणार हे फक्त बाकी आहे, असा केला. हे बडे प्रस्थ कोण आहेत, यावर बोलणं आंबेडकरांनी टाळलं आहे.

भन्साळींचा मोठा खुलासा; Heeramandi मध्ये पाकिस्तानी स्टार्संसोबत दिसणार होत्या रेखा, करीना अन् राणी 

सातारा लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार प्रशांत कदम यांच्या प्रचारसभेसाठी आंबेडकर साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, एकीकडे पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात सॅडविच झालेल्या कॉंग्रेसला सहकार्याचा हात देऊ. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक ठिकाणी तडजोडीचे उमेदवार दिले आहेत. नागपुरात काँग्रेसच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिल्यानंतर आनंद व्यक्त करण्याऐवजी नाना पटोले यांनी नितीन गडकरींच्या पराभवावर दु:ख व्यक्त केले. यातून दोन्ही पक्षांमधील छुपा समझोता उघड झाला, असं आंबेडकर म्हणाले.

Student of the Year 3: अंकिता लोखंडे ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’ चा भाग नसणार, चर्चांना उधाण 

मोदींच्या जुमल्यांना स्थानिक पक्षांनी उध्दस्त केलं
ते म्हणले, दुर्दैवाने स्थानिक पक्ष आता विरोधी पक्ष बनत चालला आहे. मोदींच्या गॅरंटीचा लोकच आता खिल्ली उडवत असून नोटबंदी, कर्जवाढ, बेरोजगारी, सरकारी मालमत्ता विकणे हीच मोदींची गॅरंटी असल्याचं लोक म्हणत आहेत. मोदींच्या या जुमल्यांना लोकांनी स्थानिक पक्षांनी उध्दस्त करून टाकले आहे, असं आंबेडकर म्हणाले.

मोदींच्या पुण्यातील सभेत 40 टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. बरेच लोक अर्ध्यातून उठून गेले, यारून 2014 च्या निवडणुकीत मोदींचा करिष्मा आता संपला. भारतीय जनता पक्षाचे ‘अबकी बार चारशेपार’ धोरण पूर्णपणे उद्धवस्त होतांना दिसत आहे. ते चारशेवरून तीनशे आणि आता दोनशेवर आल्याची परिस्थिती आहे. स्थानिक पक्षानीच त्यांची हवा काढल्याचं सर्वेवरून दिसत असल्याचं आंबेडकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज