Sangli News : खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल, मैदान सोडून पळू नकोस; विशाल पाटलांना थेट आव्हान
सांगली : विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्याने सांगली लोकसभा निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली असून, आता विशाल पाटलांसमोर (Vishal Patil) उभे ठाकलेले भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल असे म्हणत मैदान सोडून पळू असे म्हणत थेट आव्हान दिले आहे. (Sanjaykaka Patil On Vishal Patil Election)
सांगलीत तिरंगी नाही तर दुरंगीच लढत; विशाल पाटलांनी थेट सांगितलं
संजयकाका पाटील म्हणाले की, विशाल पाटलांनी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे आता तो खऱ्या अर्थाने मैदानात आलेला आहे. त्याच्या अर्जामुळे आता सुरूवात झालेली आहे. त्यामुळे जसं ट्रेलरला सुरूवात झाली असून खरा पिक्चर तर चार दिवासांनी सुरू होणार आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीदेखील आपण विशाल पाटलांना सांगितले होते आणि आजही आव्हान करतो की, मैदान सोडून पळ काढू नकोस असे आव्हान संजयकाका पाटलांनी विशाल पाटलांना दिले आहे.
पुढे बोलताना संजयकाका म्हणाले की, ज्या माणसांनी अनेत संस्था बंद पाडल्या, भ्रष्टाचार केला. अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उध्वस्त केलं. सारख कारखाना, प्रकाश अॅग्रो, वसंतदादा दूध संघ, सोनी कारखाना आणि शाबू प्रकल्प असे आठ ते नऊ प्रकल्प या लोकांनी बंद पाडले. त्यामुळे ज्यांना सहकाराच्या संस्थांवर जगायची सवय लागली त्यांनी माझ्या सारख्याची मापं काढू नयेत असे पाटील म्हणाले.
कोल्हापूरच्या बंडखोराविरोधात काँग्रेसचं कठोर पाऊल : ठाकरेंच्या मागणीनंतरही विशाल पाटलांना मात्र अभय?
मी एक खमक्या मनुष्य असून, मी गुंडगिरी करतो की, होणाऱ्या जाचापासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेले आहे. त्यामुळे मला जनतेने एकदा तुझ्या भावाचा 2019 ला तुझा आणि आता पुन्हा तुझा मोठ्या फरकाने पराभव करण्यासाठी जिल्ह्यातील लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे. योग्यवेळ आली की या सर्व गोष्टींचे खुलासे करत पोलखोल केले जाईल असेही संजयकाका पाटील म्हणाले.
विशाल पाटालांना मिळालं लिफाफा चिन्ह
सांगलीत काँग्रेस नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केल्यानंतरही विशाल पाटलांनी मैदान सोडलं नाही. त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यानंतर आता विशाल पाटलांना निवडणूक आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे आता ते विजयासाठी मतदारांसमोर लिफाफा घेऊन मत मागणार आहे. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना काल (दि. 25) नांदेड येथे विशाल पाटलांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ठाकरेंनी भर पत्रकार परिदेत तो तर बंडखोर असे म्हटले. विशाल पाटलांच्या या भूमिकेवर काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करेल, असे म्हणत ठाकरेंनी हा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टोलवला.
सायलेंट व्होटर्सच्या काळजाला हात… मंगळसूत्र अन् संपत्तीवर बोलून मोदींनी निवडणूक फिरवली?
सांगलीच्या तख्यासाठी तीन पाटील मैदानात
सांगली लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्यापासून त्यांनी तो माघारी घ्यावा यासाठी अनेक वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली होती. मात्र, त्यानंतरही या नेत्यांना विशाल पाटलांचे मन वळवण्यात अपयश आले. त्यानंतर आता आयोगाने विशाल पाटलांना निवडणूकासाठी चिन्हदेखील दिले आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी तख्यात आता भाजपचे संजयकाका पाटील, ठाकरेसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील या तीन पाटलांमध्ये कडवी लढत होणार असून, तिघांपैकी कोणते पाटील सांगलीचं मैदान मारणार याचं उत्तर 4 जूनला मिळणार आहे.