निवडणुकांच्या धामधुमीत पार्थ ‘बॅकबोन’; दिलखुलास गप्पांच्या मैफिलीत काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
पुणे : सध्या देशभरात लोकसभेची धामधूम सुरू असून, राजकीय पक्षांची नजर महाराष्ट्रावर आणि त्यातील बारामती लोकसभा मतदारसंघावर आहे. याचं कारणही खास असून, येथून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लोकसभेच्या रणांगणात उतरल्या आहेत. त्यांचा प्रचार अन् सभांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पण आज आपण सुनेत्रा पवार यांनी पुण्यात भर सकाळी सकाळी लोकप्रिय मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला दिलेला आवाज आणि त्यानंतर ‘बघ मराठी’ या यु-ट्यूब चॅनलसोबत मजेशीर मुलाखतीत गप्पांची मैफील कशी रंगली याबद्दल जाणून घेणार आहोत. (Sunetra Pawar Special Interview)
सुनेत्रा पवारांचा मुळशी तालुक्यात प्रचार दौरा! 11 गावच्या सरपंचांनी दिला पाठिंबा
…तर त्याचं झालं असं की, संकर्षण कऱ्हाडे त्याच्या नाटकाच्या प्रयोगासाठी पुण्यात आला होता. संकर्षण सकाळी वॉकसाठी जात असताना अचानक एक भली मोठी गाडी थांबली अन् त्यातून आवाज आला ‘ओ माहेरची माणसं ओळखलं की नाही?’ त्यावर संकर्षण क्षणभर चमकला आणि म्हणाला अहो तुम्हाला कोण नाही ओळखणार, तुम्ही सुनेत्रा पवार आहात पण, तुम्ही मला अशी का हाक मारलीत? असा प्रश्न संकर्षणनं सुनेत्रा पवारांना विचारला. त्यावर माहेरच्या माणसाला अशी हाक नाही मारयची तर, कुणाला मारयची असं आपलेपणाचं उत्तर सुनेत्रा यांनी दिले आणि येथूनच सुरू झाली गप्पांची मैफील.
दिलखुलास गप्पांच्या मैफिलीत काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
सुनेत्रा पवार आणि संकर्षण यांच्यामधील पुण्यातल्या रस्त्यावर सुरू झालेला संवाद थोड्यावेळातच थेट सुनेत्रा पवार यांच्या घरी पोहोचला आणि सुरूवात झाली ती गप्पांच्या मैफिलीला. या गप्पांच्या मैफिलीत सुनेत्रा पवारांनी अनेक विषयांवर दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्या म्हणाल्या की, उमेदवारी जाहीर झाल्यापासून थोडं रूटीन बदललं आहे. धावपळही वाढल्याचे सांगत धारशीव जिल्ह्यातील तेर गावाच्याी आठवणींनाही सुनेत्रा यांनी उजाळा दिला.
सुनेत्रा पवार अन् धंगेकरांची अचानक भेट; सुसंस्कृत राजकारणाच्या पुणे पॅटर्नचा आला प्रत्यय
प्रचाराची पूर्वीपासूनच सवय पण…
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सध्या लोकसभेच्या प्रचारसभांमुळे धावपळ दगदग वाढली आहे. पण, ही धावपळ आणि प्रचार माझ्यासाठी नवीन नाही. कारण, मी पूर्वीपासूनच लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्ये घरातलं जे कुणी उमेदवार आहे त्यांच्यासाठी प्रचार केलेला आहे. माझे भाऊ डॉ. पद्मसिंह पाटील निवडणुकीला उभे राहिले की, मी त्यांच्या प्रचाराला जायचेच त्यामुळे प्राचाराची मला सवय पहिल्यापासूनच आहे. परंतु, यावेळी पहिल्यांदाच माझ्यासाठी म्हणून मला स्वतःला प्रचार करावा लागतोय.
अजितदादा आणि आम्ही एकत्र जाणं हेच आवडीचं ठिकाण
अजितदादांना कधी घरातल्यांना वेळ द्या अशी सांगायची वेळ येते का? यावर उत्तर देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजितदादांना कधी कधी सांगावं लागतं की, स्वतःसाठी वेळ द्या, तब्येत बरी नसेल किंवा काही महत्त्वाचं काम नसेल तर, ते आम्ही सांगितलेलं ऐकतात. एकत्र कुठे फिरायला जायला आवडतं असे विचारले असता त्या म्हणाल्या की, अजितदादांच्या पाठीमागचा व्याप मोठा आहे. त्यामुळे कुठेही एकत्र जाणे हेच आमच्यासाठी आवडीचं ठिकाणं असतं असे त्यांनी सांगितले. आम्ही आमच्या फार्म हाऊसला एकत्र गेलो तरी छान वाटतं. प्रवासादरम्यान मी माझा गाणी ऐकण्याचा छंद आवर्जून पूर्ण करते. अर्जितसिंग आणि सोनू निगम हे गायक आपल्याला आवडतात असे सांगत शास्त्रीय ते आधूनिक सर्व गाणे मला ऐकायला आवडतात असे त्या म्हणाल्या. याशिवाय नाटक, कवितादेखील ऐकायला आणि बघायला आवडतात असे सुनेत्रा यांनी सांगितले.
तुम्ही खासदार होणारच, पण अजितदादाही मुख्यमंत्री होणार; ज्येष्ठ नागरिकाचा सुनेत्रा पवारांना आशीर्वाद
अजितदादांचा कोणता गुण आवडतो?
अजित पवारांना साड्या खरेदी करायची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ते घरातल्या प्रत्येक महिलांसाठी आवर्जुन खरेदी करतात. नवरा म्हणून मला त्यांच्या अनेक गोष्टी भावतात पण, त्यातही त्यांचा वक्तशीरपणा घेण्यासारखा असल्याचे सुनेत्रा यांनी सांगितलं. अजितदादांना माझ्या हातची साबुदाण्याची खिचडी आणि पुरणपोळी जाम आवडते असे त्या म्हणाल्या.
निवडणुकांच्या धामधुमीत पार्थ ‘बॅकबोन’
निवणडुकांच्या धामधुमीत मी आणि अजितदादा दोघेही व्यस्त असल्याने पार्थ पवार घरातील जबाबदारी बॅक बोन म्हणून उत्तमरित्या संभाळत असल्याचे म्हणत सुनेत्रा पवारांनी पार्थ यांची पाठ थोपटली. पार्थ समोर येत नाही असे काही नसून, तो पडद्यामागची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळत असल्याचे त्या म्हणाल्या. अजितदादा कॅज्युअल वेअरमध्ये अधिक उठून दिसतात असं कौतुकही यावेळी त्यांनी केले. यावेळी सुनेत्रा पवार यांना पार्थ पवार यांच्याशी कसं ट्युनिंग आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, पार्थशी माझं प्रेमाचं आणि धाकचं असं दोन्ही नात असल्याचे सांगितलं