काळजी घ्या! उन्हाचा चटका वाढला, तापमान चाळीशीपार…पुढील 4 दिवस महत्वाचे

Maharashtra Weather Update Minimun Temprature : मागील काही दिवसांपूर्वी राज्यात तापमानाचा आलेख (Maharashtra Weather Update) वर चढतोय. सूर्य तापल्यामुळे अनेक शहरांमध्ये 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झालीय. कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय. आता उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज (Temprature) असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कर्नाटक आणि परिसरात चक्राकार वारे वाहत (Unseasonal Rain Prediction) आहे. त्यामुळे मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होतोय. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतामध्ये ढगाळ हवामान आहे. पुढील चार दिवस महत्वाचे आहेत. गुजरातकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबई, उपनगर आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा तर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी गारपिटीचं संकंट कायम आहे.
कमी व्याजदराने मिळणार कर्ज अन् EMI ही होणार कमी, आरबीआय करणार मोठी घोषणा
महाराष्ट्रात उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरूवात झालीय. त्यामुळे राज्याच्या तापमानामध्ये किमान वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, सोलापूर तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या शहरांचे तापमाळ चाळीस अंशांपलीकडे गेले आहेत.
राज्यातील अकोला शहरात 43.2 अंश इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद धाली आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिसने वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा झाली.
‘या’ राशीच्या लोकांनी आज सावधगिरी बाळगा…कसा असेल तुमचा आजचा दिवस?
या पावसामुळे उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला होता. परंतु पुन्हा राज्यात उष्णता वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर वातावरणात बदल होवून पुन्हा 10 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि वादळी हवामान यासह हलका पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.