विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! नगरमध्ये उभारले विद्यापीठाचे उपकेंद्र…

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! नगरमध्ये उभारले विद्यापीठाचे उपकेंद्र…

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अहमदनगर उपक्रेंद्राच्या (University Sub-Centre) नूतन इमारतीचे उद्धाटन येत्या रविवारी (3 मार्च) होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय अखेर मार्गी लागला आहे. बाबुर्डी घुमट येथील तब्बल 83 एकर परिसरामध्ये ही इमारत उभी राहिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोणत्याही शैक्षिणक कामासाठी विद्यार्थ्यांची पुण्यासारख्या ठिकाणी होणारी पायपीट यामुळे थांबणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र विखे (Rajendra Vikhe) यांनी दिली.

नगर शहरापासून जवळच असलेल्या बाबुर्डी घुमट येथे तब्बल 18,000 स्के. फु. जागेवर या नव्या विद्यापीठ उपकेंद्राची बांधणी करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या ठिकाणी ‘विद्यार्थी सुविधा केंद्रा’ची निर्मिती करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना आता विविध शैक्षणिक कामासाठी पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येण्याची गरज नाही.

बारामतीत आवाज फक्त थोरल्या पवारांचाच, शरद पवार गटानं थेट व्हिडीओच दाखवला

विशेष म्हणजे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या या कक्षामार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, विविध प्रमाणपत्रांचे अर्ज स्विकारणे, परीक्षेच्या निकाल पत्रातील दुरूस्ती संदर्भात अर्ज स्विकारणे, सुधारीत निकाल पत्र देणे तसेच विद्यापीठात असणाऱ्या विविध शैक्षणिक कार्सेसची माहिती या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दिली जाणार आहे. लवकरच याठिकाणी मुलांचे व मुलींचे वसतिगृह देखील बांधले जाणार आहे.

..तर नेत्यांनी सांगितल्यावरही लोकसभेचे काम करणार नाही; शिवतारेंचा अजित पवारांना इशारा

मंत्र्यांसह ‘हे’ नेतेमंडळी उपस्थित राहणार
रविवारी या नूतन इमारतीचं उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती खासदार सुजय विखे पाटील, प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, डॉ.राजेंद्र विखे पाटील,अध्यक्ष, आयोजन समिती, डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव हे उपस्थितीत राहणार आहे.
‘मावळ’ ‘राष्ट्रवादी’कडे गेलं, तर काय करणार? बाळा भेगडेंच्या उत्तराने ‘इलेक्शन पिक्चर’ क्लिअर!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube