Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी समाजातून (Kunbi community) आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्यानं आता कुणबी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण (OBC reservation) देऊ नक, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी या प्रकरणी शनिवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू करून आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI मराठा आरक्षणाच्या […]
Kolhapur News : कोल्हापुरातील महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्यातील 1272 सभासद अपात्र ठरले आहेत. यासंदर्भात साखर कारखाना सहसंचालकांनी गुरुवारी निकाल दिला आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या साखर कारखाना निवडणुकीत महाडिक गटाने बाजी मारल्यानंतर मतदार यादीत 1272 सभासद अपात्र असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला होता. अखेर सहसंचालकांनी हे सभासद अपात्र ठरले […]
सांगली : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची शिवशक्ती परिक्रमा (Shiv Shakti Parikrama) यात्रा सांगली जिल्ह्यात पोहोचताच इस्लामपूरमध्ये यात्रेच्या नियोजनातील गोंधळ समोर आला. पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी भाजपचे काही कार्यकर्ते थांबले असतानाच त्यांचा मुडे यांचा ताफा थेट कोल्हापूरकडे रवाना झाला. त्यामुळं स्वागतासाठी ताटळकत उभे असलेले कार्यकर्ते नाराज झाले. दरम्यान, या गोंधळाबद्दल मुंडे यांनी कार्यकर्त्यांची […]
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागितलेल्या तिन्ही गोष्टी घेऊन राज्य सरकारच्यावतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली. मात्र त्यानंतरही जरांगे पाटील त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. याशिवाय उर्वरित मुद्द्यावर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता नेमके कोणत्या मुद्द्यावर पाटील यांनी त्यांचे आंदोलन चालू […]
जालना : राज्य सरकारने दिलेले चर्चेचे निमंत्रण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी स्वीकारले आहे. आता ते किंवा त्यांचे शिष्टमंडळ खास विमानाने मुंबईला जाणार आहेत. यामुळे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या शिष्टाईला काहीसे यश आल्याचे दिसून येत आहे. निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर, आंदोलकांवरील खटले मागे घेणे आणि […]
जालना : सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्याची तरतुद असल्याचा सुधारीत जीआर घेऊन या, तुमच्याच हाताने पाणी पितो असे म्हणत माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उलट ऑफर दिली. निजामकालीन नोंदी असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीचे दाखले देणे, खटले मागे घेणे आणि लाठीचार्जचा आदेश […]