पुणे : कोथरुड येथील कुस्तीमहर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022-23 च्या उद्घाटन झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आयोजक आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती होती. कुस्तीपटू आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करतात. […]
अहमदनगर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख असलेली ‘अहमदनगर महाकरंडक २०२३’ ही एकांकिका स्पर्धा ११ ते १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत अहमदनगर येथील माऊली सभागृहात होत आहे. यंदाचं स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील २७ संघ सहभागी झाले आहेत. अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल […]
औरंगाबाद : मी पवारांना इथून उपटून टाकणार असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पत्रकार परिषदेत दिलंय. ते औरंगाबादमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलत असताना पवार घराण्यावर विषारी टीका केली आहे. ते म्हणाले, अजित पवार मला उपटसुंभा म्हणाले, होय मी उपटसुंभा आहे. मी पवारांना इथून उपटून टाकणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून, राजकारणातून पवारांचं घराणं मी उपटून टाकण्याचं काम हाती […]
मुंबई : बारामतीचे पवार चुलते पुतणे म्हणजे चोरट्यांची टोळी आहे. राज्याची तिजोरी त्यांनी लुटून खाल्ली. शरद पवार म्हणजे जाणता राजा नसून नेणता राजा आहे’, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. या प्रश्नावर पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले. अजित पवार म्हणाले, ‘तो कोण कुठला उपटसुंभ, त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काय […]
अहमदनगर : भारतातील अग्निवीर जवानांच्या पहिल्या बॅचचे सैनिकी प्रशिक्षण अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर अँड स्कूलमध्ये (एसीसी अँड एस) सुरु झाले आहे. जवानांना येथे सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण मिळणार आहे. अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर अँड स्कूलच्या अंतर्गत औरंगाबाद रस्त्यावरील बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट आणि जामखेड रस्त्यावरील अमेमेंट इलेक्ट्रॉनिक रेजिमेंट या दोन विभागात हे प्रशिक्षण सुरू […]
मुंबई : अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठणकावून सांगितलंय. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर पवार पत्रकार परिषद बोलत होते. पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जात असून आमच्या पक्षात सर्व धर्माला […]