चंद्रपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे विरोधकांबरोबर जाऊन मिळाले. अशा लोकांना तुम्ही माफ करणार आहात का? असा सवाल चंद्रपूर येथे आयोजित जाहीर सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डी यांनी उपस्थितांना विचारला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव बंद केले. […]
मुंबई – गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला मान्य आहे का? मान्य नसेल तर गोळवलकरांचे पुस्तक भाजपची अध्यात्मिक आघाडी जाळणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी विचारला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात भाजपने पुकारलेले आंदोलन एकदम चुकीचे आहे, असेही महेश […]
चंद्रपूर : सी फॉर कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी सी फॉर चंद्रपुरसारखी दुसरी कोणती भूमी असू शकत नसल्याचं वक्तव्य भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. आज चंद्रपुरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. या सभेत मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, आरपार रावणला पराभूत करायचं असेल तर आरपार रामापासून गोष्ट सुरु […]
अहमदनगर: माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांना संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आमदार पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर आमदार पाचपुते यांचे पुतणे काष्टी गावचे सरपंच साजन पाचपुते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खंत व्यक्त केली. तसेच राजीनामा देण्याआगोदर ज्या जनतेनी निवडून दिले होते, त्या जनतेला देखील […]
मुंबई : राज्यातील 60 आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला 144 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर राज्यातील 12 खासदारांच्या सुरक्षेवर दर महिन्याला अडीच कोटी रुपये खर्च होत आहेत. तर वर्षाला दीडशे कोटी रुपये खर्च होत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत […]
अहमदनगरः अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत शिंदे-भाजप सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने नगर महापालिकेला पत्र पाठवून महासभेत नामांतराचा प्रस्ताव घेऊन बहुमताचा ठराव पाठवण्याचे आदेश दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी विधानपरिषदेत केली होती. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मागवण्यात आल्याने अहमदनगर महापालिकेतील अधिकारी गोंधळून गेले […]