बीड : मला कुठलंच व्यसन नाही असे सांगताच विनायक मेटे म्हणाले, लोकांना दाखवून द्यायचं आहे की, व्यसन केलं नाही तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेंटेंच्या आठवणींना उजाळा दिल्या. दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. […]
मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज शिवतीर्थवर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राणे यांनी आज अचानक राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने राज्याच्या राजकारणात चर्चाना मोठे उधाण आले आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट घेतली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पण आगामी मुंबई महापालिका निवडणुका […]
नागपूर : हिवाळी अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. विदर्भातील धान, संत्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास होता पण तसे झाले नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पीकविम्यावर सरकार बोललेच नाही. ५० रुपये ५ रुपयांचा चेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून […]
पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत. स्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून पुण्याकडून अहमदनगर बाजूकडे […]
मुंबई : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी यापूर्वीच तिचा सहकलाकार शेजान खानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. शेजान खान पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात सातत्याने सक्रिय आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शेजान खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वनिता शर्मा […]
नवी दिल्ली : सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहेत. ‘सीबीएसई’ कडून दोन्ही बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहता येईल. CBSE १० वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर १२वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते […]