Nana Patole : राज्यातील टोलवरील वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हलक्या वाहनांकडून टोल घेतला जात नाही असं वक्तव्य केलं आणि या वादाला अधिकच धार चढली. आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या वक्तव्याची शहानिशा करणार तसेच टोलनाक्यावर जर कुणी अडवलं तर टोलनाकाच जाळून टाकण्याचा इशारा दिला. […]
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार येत्या दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमधून आणि 28 तालुक्यांमधून ही यात्रा निघणार आहे. एकूण 22 मुद्द्यांवर आधारे ही यात्रा असणार आहे. दसऱ्याला (24 ऑक्टोबर) पुण्यातील भिडे वाडा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने यात्रेची सुरुवात होणार असून नागपूरमध्ये पवार यांच्याच […]
पुणे : महाराष्ट्रातील पुणे आणि चंद्रपूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (9 ऑक्टोबर) राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. यावेळी आयोगाकडून नागालँडमधील एका विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. मात्र पुणे आणि चंद्रपूरच्या पोटनिवडणुकीची घोषणा केलेली नाही. (no by-elections […]
अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) दुपारी शाळेतून परत येत असताना रासने नगर जवळ त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी आज (9 ऑक्टोबर) या हल्ल्याबाबतची माहिती माध्यमांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. […]
Raj Thackeray : प्रवाशांच्या खासगी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. फक्त व्यावसायिक वाहनांकडून टोल घेतला जात आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज चांगलाच समाचार घेतला. तसेच राज्य सरकारला रोखठोक इशाराही देऊन टाकला. राज ठाकरे […]
Dhananjay Munde : जोपर्यंत शेतकऱ्यांना पिकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान मिळणार नाही, तोपर्यंत मी हार तुरे आणि फेटे बांधून घेणार नाही, असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे परळी तालुक्यातील सिरसाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी […]