अमरावती : माझा अमरावती दौरा पूर्वनियोजित होता. त्यामुळे मी पुण्यातील कालवा समितीच्या बैठकीला अनुपस्थित होतो. मात्र अजित पवार यांनी तातडीची बैठक घेतली. त्यामागे कारणही महत्वाचं होतं. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे त्यांनी बैठक घेणं बरोबर आहे. मी बैठकीला ऑनलाइन उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण ते तांत्रिक कारणामुळे शक्य झाले नाही. मात्र दुपारच्या […]
Chandrakant Patil : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे अगोदर पुण्याचे पालकमंत्री होते. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.तर चंद्रकांत पाटलांना अमरावतीचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यात चंद्रकांत पाटील हे चंद्रकांत पाटील पुण्यात नियमित बैठका घेत नसतं. अशी त्यावरून अनेकदा चर्चा झाली होती. त्यानंतर आता दर आठवड्याला अमरावतीत यावं […]
पुणे : आगामी लोकसभेसाठी (Lok Sabha) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. मनसेने पुण्यावर लक्ष केंद्रीत केलं. बारामती लोकसभा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन काल राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मनसेचे फायरब्रॅंड वसंत मोरे (Vasant More) यांनी पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यास पुणे लोकसभेवर मनसेचा झेंडा नक्कीच […]
Ajit Pawar : पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पावर (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यामध्ये कालवा समिती बैठक झाली. त्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला असता. त्यांनी सावध भुमिका घेत आरक्षण देण्याचं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले अजित पवार? आज पुण्यामध्ये […]
Manoj Jarange Patil : गेल्या महिन्याभरापासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह मराठा समाज मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आक्रमक झाला आहे. मात्र, अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळं आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. अंतरवली सराटी गावात सभा घेतल्यानंतर त्यांची आज राजगुरूनगऱमध्ये […]
Pune News : अजित पवार सरकारमध्ये दाखल झाल्यापासून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील सुप्त संघर्ष राजकारणात दिसून येत आहे. पालकमंत्रीपदाचा मुद्दा असो किंवा निधीवाटप असो या सगळ्यांत दोन्ही दादांत खटके उडाल्याचेही दिसून आले. अजितदादादांची नाराजी सध्या परवडणारी नाही म्हणून चंद्रकांत पाटील यांचे पुण्याचे पालकमंत्री पद काढून घेऊन अजितदादांना देण्यात आले. […]