“फडणवीस अनुभवी त्यांनी आता…” काँग्रेसमधील मित्राने व्यक्त केली खास अपेक्षा
Nana Patole on Devendra Fadnavis : राज्यात महायुतीचं सरकार अखेर स्थानापन्न झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता या सरकारने कामकाजाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनीही घेरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खास अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. शपथविधी सोहळ्याचा निरोप दिला असता तर नक्कीच गेलो असतो. आम्हाला बोलावलं नाही. माझे मित्र सीएम झाले त्यांना शुभेच्छा आहेत. आता त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
नाना पटोलेंना आरएसएसचा एजंट म्हणे भोवणार; बंटी शेळकेंचे काँग्रेसमधून निलंबन होणार ?
पटोले पुढे म्हणाले, निरोप कोणाला दिला याची माहिती नाही, निरोप असता तर गेलो असतो. आम्हाला कधीच बोलावलं नाही. पण माझे मित्र सीएम झाले त्यांना शुभेच्छा आहेत. आता त्यांनी महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. कंत्राटी भरती आम्ही बंद करू असे फडणवीस म्हणाले होते आता शिक्षकांची कंत्राटी भरती त्यांनी थांबवावी आणि नियमित शिक्षक भरती करावी. ग्रामीण भागात बस जात नाही. ग्रामीण भागात एसटी सेवा बंद करत आहे का ? असा प्रश्न पडला आहे. बस सेवा पूर्ववत करावी.
शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. राज्याची कायदा सुव्यवस्था सुधारावी, फडणवीस यांना गृह विभागाचा मोठा अनुभव आहे. गृह विभाग त्यांच्याकडेच राहील अशी आमची अपेक्षा आहे. भाजप आणि त्यांचे सोबती हे संविधानापलीकडचे लोकं आहेत. शपथविधीची तारीख राज्यपाल जाहीर करतात. मात्र यावेळेला यांनीच घोषणा केली आपण त्यात पडू नये. फडणवीस या मित्राकडून आमच्या अपेक्षा आहेत ते अनुभवी आहेत असेही नाना पटोले म्हणाले.
महायुती सरकार राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल, आशुतोष काळेंना विश्वास
ईव्हीएमचा मुद्दा देशभरात पोहोचला
ईव्हीएम विरोधातला आवाज जनतेचा आहे. राजकीय पक्षांचा नाही. आता संपूर्ण देशात ईव्हीएचा घोळ चर्चेचा विषय झाला आहे. मारकरवाडीने सरकारच्या मनात लपलेला मतं चोरणारा डाकू सर्वांसमोर आणला आहे. तिथले लोक मॉक पोल करू इच्छित होते मात्र सरकारने ते करू दिलं नाही. सरकार का घाबरले? सरकारने त्या ठिकाणी मतदान का होऊ दिले नाही ? पोलिसांच्या माध्यमातून सरकारने तिथे बूथ कॅपचरींग का केली? लोकांच्या मतांच्या अधिकारावर डाका घातला जात आहे अशी आता महाराष्ट्राची भावना झाली आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) आधी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे आमचे पत्र देऊ. ही आमची परंपरा आहे आणि आता जे सत्ता पक्षात आहेत त्यांचे निर्णय कुठे झाले? एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे (Ajit Pawar) स्वतंत्र पक्ष होते पण त्यांचा निर्णय कुठे झाला असे सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केले.