ठाण्यात भाजप-शिंदेंमधील धुसफूस! स्वबळावर लढण्यासाठी भाजपकडून इच्छुकांची चाचणी सुरू

BJP Shivnena स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. याचीची प्रचिती ठाणे महानगर पालिकेमध्ये येणार असल्याचे संकेत आहेत.

BJP

BJP ready for Thane Municipal Corporation Election after clashes with Shivnena : राज्यामध्ये सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत कुठे महाविकास आघाडी तर कुठे महायुती यांची समीकरण कशी जुळतात? हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येईल.मात्र स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. याचीच प्रचिती ठाणे महानगर पालिकेमध्ये येणार असल्याचे संकेत आहेत.

Virat Kohli : ‘तुम्ही फक्त तेव्हाच अपयशी ठरता जेव्हा…’, निवृत्ती घोषणा? कोहलीच्या पोस्टमुळे क्रिकेट विश्वात खळबळ

कारण ठाणे महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसवण्यासाठी तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील कामाला लागले आहे. त्यात वनमंत्री गणेश नाईक हे शिंदेंवर सातत्याने टीका करत आहेत त्यामुळे ठाण्यात महायुतीतील संबंधित आणले गेले आहेत. याच दरम्यान आता भाजपने ठाण्यामध्ये कंबर कसायला सुरूवात केली आहे.

मेटा एआयच्या ग्लोबल सेलिब्रिटी व्हॉइस लाईनअपमध्ये सामील होणारी दीपिका ठरली पहिली भारतीय

ठाणे महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसवण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महापालिकेतील 33 प्रभागातील इच्छुकांची आज 16 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत परीक्षा घेतली जाणार आहे.यासाठी भाजपने इच्छुक उमेदवारांचे परिचय पत्र भरून घेणार आहे. यावेळी त्यांना पक्षाकरिता तसेच प्रभागासाठी काय काम केले याचे निकष लावले जातील. त्यामुळे या अभ्यास वर्गासाठी नगरसेवकांसह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचा आवाहन देखील पक्षाकडून करण्यात आले.

श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने ‘निर्धार’ चित्रपटाचे कुतूहल जागवणारे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित…

दरम्यान दुसरीकडे भाजपच्या या जयत तयारी आणि महापौर पद मिळवण्याच्या इच्छेमुळे ठाण्यामधील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. वनमंत्री गणेश नाईक हे शिंदेंवर सातत्याने टीका करत आहेत त्यामुळे ठाण्यात महायुतीतील संबंधित आणले गेले आहेत. त्यामुळे ठाण्यामध्ये भाजपाने शिवसेना हे निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us