२३ जुलैला अर्थसंकल्पाची घोषणा झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण सुरू आहे. आजही सोनं 300 रुपयांनी घसरलं आहे.
बेलापूरमधील फणस पाडा परिसरात आज पहाटे 5 वाजण्याच्या 4 मजली इमारत कोसळली. अेकजण दबल्याची भीती व्यक्त होत आहे.
वरळीतील स्पा सेंटरमध्ये गुरू सिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वाघमारेला चुलबूल पांडे नावानेही ओळखलं जात होतं.
लाडकी बहीण योजनेवर अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.
शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी भाजपात प्रवेश केला होता.
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंबार यांनी पूजा खेडकर प्रकरणानंतर आता एमपीएससीतही अशी प्रकरणं समोर येण्याची शक्यता असल्याचं म्हटल आहे.