मुंबई : बाईक टॅक्सीची सेवा देणारी कंपनी ‘रॅपिडो’ ला आपली बाईक टॅक्सीची सेवा बंद करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कंपनीला पुण्यातील आपली सेवा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाईक टॅक्सीसोबत कपंनीची रिक्षा, डिलिव्हरी या सेवाही विनापरवाना असल्याचं यावेळी स्पष्ट झालं आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून बाईक टॅक्सीची सेवा देणारी कंपनी ‘रॅपिडो’ […]
मुंबई : ज्येष्ठ लेखक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांची मराठी भाषा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली. दीक्षित यांनी राजीनामा देताना भाषा आणि वित्त विभागाच्या कारभारावर टीका केली आहे. करमणूकप्रधान, उत्सवी पद्धतीच्या उपक्रमांवर उधळपट्टी कशासाठी? अशी विचारणा दीक्षित यांनी केली आहे. भाषा […]
पुणे : एमपीएससीने परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या विरोधात पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएसी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थी आक्रमक झाले असून आज (ता.13 जानेवारी) सकाळपासूनच चौकात ठाण म्हणून बसले आहेत. आयोगाकडून परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये करण्यात आलेला बदल हा 2025 पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर चौकात पोलीस बंदोबस्त […]
मुंबई : मराठवाडयाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर नागपूरची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कोकणातील जागा शेतकरी कामगार पक्ष व अमरावती व नाशिक कॉंग्रेस लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. महाविकास आघाडीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने छापेमारी केली आहे. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर, कार्यालयांवर ईडीसह आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, यापूर्वी मुश्रीफ यांच्यावर आयकर विभागाने […]
(प्रफुल्ल साळुंखे यांजकडून) मुंबई : राज्यातील निराधारांसाठी महत्वाचे ठरलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत त्रिपक्षीय करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही संस्था भाजपचे विधान परिषदेतील आमदार श्रीकांत भारतीय यांच्याशी संबंधित आहे. या योजनेसाठी शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी लोकप्रतिनिधींच्या संस्थांना […]