आधी चिराग, नंतर त्यागी.. बिहारी राजकारणांतून ‘मित्रां’ना भाजपाचा करेक्ट मेसेज!
NDA Government : देशात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर संसदीय मंडळाच्या पहिल्याच बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व घटक पक्षांच्या प्रवक्त्यांनी समन्वय ठेऊन काम करावे असे सांगितले होते. पण, आता सरकार स्थापन होऊन तीन महिने झाल्यानंतर काही वेगळे सूर कानी पडू लागले आहेत. काही मुद्द्यांवर सरकारमधील घटक पक्षांची भूमिका विरोधी इंडिया आघाडीशी (INDIA Alliance) मिळतीजुळती दिसून आली. एडीएतील प्रमुख (NDA Government) पक्ष भाजपने पहिल्या राजकीय पिक्चरमधून गायब असलेल्या पशुपति पारस यांची बिहार प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घडवून एक मेसेज दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी (KC Tyagi) यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
एनडीएतील सहकारी लोजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याप्रमाणेच केसी त्यागी यांची भूमिकाही एनडीएत मतभेदाचे संकेत देत होती. केसी त्यागी यांनी काही दिवसांपूर्वी एक लेख लिहिला होता. हा लेख बिहारमधील एका वृत्तपत्रातही छापला गेला होता. यामध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं सध्याचं राजकारण योग्य असून जातनिहाय जनगणना काळाची गरज असल्याचे मत त्यागी यांनी व्यक्त केले होते. त्यागी यांनी याआधी पॅलेस्टाइन युद्धाच्या (Israel Palestine War) वेळीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळला होता. भारताने इस्त्रायलची मदत (India Israel) करू नये असे त्यांचे म्हणणे होते. त्यागी जेडीयूतील दिग्गज नेते आणि नीतीशकुमार (Nitish Kumar) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. परंतु, त्यांच्या अलीकडच्या वक्तव्यांनी भाजपला अस्वस्थ केले होते.
चुकीला माफी नाही! चक्क केंद्रीय मंत्र्याच्या वाहनावर कारवाई; बिहारमध्ये काय घडलं?
जेडीयूचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री ललन सिंह आणि संजय झा या दोघांनी त्यागी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांना प्रवक्तेपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. तसं पाहिलं तर त्यागी यांनी एक वर्षापूर्वीच पद सोडण्याचा आग्रह केला होता. मागील चार महिन्यांरपासून तर त्यांनी कोणत्याही डिबेटमध्ये भाग घेतला नव्हता. ‘मी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दोघांबरोबरही काम केलं आहे. माझा भाजपला कोणताच विरोध नाही. राजीनामा देण्यामागे माझं वैयक्तिक कारण आहे’, असे त्यागी म्हणाले होते.
या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणांचा हवाला दिला जात असला तरी त्यागी यांचा राजीनामा चिराग प्रकरणानंतरचा दुसरा अंक म्हणूनच चर्चिला जात आहे. आधी चिराग पासवान आणि आता केसी त्यागी. एनडीएतील घटक पक्षांसाठी कठोर संदेश म्हणून या घटनांकडे पाहिले जात आहेत. सरकारमध्ये राहून सरकारविरुद्ध वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे.
शाह भेटीनंतर चिराग नरमले
वक्फ बिल (Waqf Bill) किंवा यूपीएससी लेटरल एन्ट्रीच्या माध्यमातून भरतीची जाहिरात. चिराग पासवान यांनी अनेकदा सरकारपेक्षा वेगळी भूमिका मांडली होती. इतकेच नाही तर चिराग यांच्या पक्षाने झारखंडमध्ये स्वबळावर (Jharkhand Elections) लढण्याचीही घोषणा केली होती. पण आता चिराग पासवान यांचे सूर बदलले आहेत. अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर भाजपबरोबरील मतभेद निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आहेत तोपर्यंत मला त्यांच्यापासून कुणीही वेगळं करू शकत नाही.
मोठी बातमी! नितीशकुमारांच्या जेडीयूत खांदेपालट; बड्या नेत्याने दिला राजीनामा, कारण काय?
भाजपला वाटत असेल तर बिहारमधील आगामी विधानसभा (Bihar Elections) निवडणुका आम्ही एनडीएसोबत लढण्यास तयार आहोत असे त्यांनी सांगितले. चिराग पासवान आता भाजपबरोबर एकनिष्ठ असल्याचे सांगत आहेत. खरंतर त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमागे त्यांचे काका पशुपति पारस आणि अमित शाह यांच्या भेटीचा इफेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीद्वारे भाजपने चिराग पासवान यांना स्पष्ट संदेश दिला आहे की आम्ही वेगळा प्लॅनही तयार करून आहोत.