“केजरीवाल माझ्या स्वप्नात आले अन् म्हणाले आता तुम्ही..” घरवापसी केलेल्या नगरसेवकाचा अजब दावा
Delhi Politics : राजधानी दिल्लीत या आठवड्याची सुरुवात राजकीय (Delhi Politics) घडामोडींनीच झाली. आम आदमी पार्टी सोडून भाजपात गेलेले (BJP) पाच नगरसेवकांपैकी एक रामचंद्र पुन्हा माघारी परतले आहेत. दिल्लीतील प्रभाग 28 चे नगरसवेक रामचंद्र आमदारही राहिलेले आहेत. आप सोडून भाजपात प्रवेश केल्याच्या चार दिवसांनंतर त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. माझी दिशाभूल करण्यात आली होती. मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पु्न्हा आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.
सिसोदिया यांची भेट घेतल्यानंतर बवाना म्हणाले, मी एक चुकीचा निर्णय घेतला होता. पण आता मी पुन्हा माझ्या कुटुंबात परतलो आहे. काल रात्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी मला चांगलंच फटकारलं म्हणाले रामचंद्र आता मनीष सिसोदिया, गोपाल राय, संदीप पाठक आणि सर्व नेत्यांना भेटा. त्यांच्याबरोबरच काम करा. यामुळेच मी कधीच आम आदमी पार्टीपासून (Aam Aadami Party) दूर राहू शकत नाही. मी आज शपथ घेतो की मला ज्या पद्धतीनं दिशाभूल करून फसवण्यात आलं. भविष्यात मी पुन्हा त्यांच्या बतावणीला बळी पडणार नाही.
Delhi Liquor Scam : षडयंत्राचा सूत्रधार अरविंद केजरीवाल; ईडीच्या चार्जशीटमध्ये कोण-कोणते आरोप?
यानंतर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही एक्सवर एक पोस्ट लिहिली. आम आदमी पार्टीचे जुने सहकारी बवाना विधानसभेचे माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक रामचंद्रजी यांच्याशी भेट झाली. आज ते पुन्हा आम आदमी परिवारात परतले आहेत असे सिसोदिया यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
दरम्यान, दिल्ली दारू घोटाळ्यात (Delhi Liquor Scam) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात आहेत. तर मनीष सिसोदियांना नुकताच जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर तब्बल सतरा महिन्यांनी सिसोदिया तुरुंगाबाहेर आले आहेत. पक्षाचा मुख्य नेता तुरुंगात असल्याने पक्षातील नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे पक्षातून आऊटगोइंगही सुरू झालं आहे. आताच पाच नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यातील एक नगरसेवकाने पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.
मोठी बातमी! सीबीआयकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक