काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

Giti Koda joins BJP : झारखंडमध्ये (Jharkhand Politics) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या एकमेव खासदार गीता कोडा (Giti Koda) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी आणि विरोधी पक्षनेते अमर बौरी यांच्या उपस्थितीत गीता कोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गीता कोडा ह्या माजी मुख्यमंत्री मधु कोडा (Madhu Koda) यांच्या पत्नी आहेत. गीता कोडा सिंहभूमच्या खासदार आहेत.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार गीता कोडा यांनी गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की काँग्रेस पक्ष म्हणतो की सर्वांना बरोबर घेऊन चालतो, पण फक्त स्वत:च्या कुटुंबाला सोबत घेतले जाते. जिथे जनहित आहे तिथेच राहिले पाहिजे. काँग्रेसमध्ये जनहिताकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे योग्य नाही. त्यामुळे मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले आहे. मी इथेच राहून जनहितासाठी काम करेन. काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करते. तिथे माझा जीव गुदमरत होतो, असे त्या म्हणाल्या.

2018 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला
सिंहभूममधून लोकसभेत पोहोचणाऱ्या गीता कोडा या पहिल्या खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एनडीएचे उमेदवार आणि तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुवा यांचा पराभव केला होता. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण गिलुवा यांनी गीता कोडा यांचा पराभव केला होता.

वडील कारगिल युध्दात लढले अन् मुलगा रांची कसोटीत टीम इंडियाचा हीरो

तर 2009 मध्ये झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत गीता कोडा 25 हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी झारखंडच्या सर्वात तरुण आमदार होण्याचा विक्रमही केला होता. त्यावेळी गीता कोडा 25 वर्षांच्या होत्या. गीता कोडा यांनी 2018 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मोठी बातमी! मनोज जरांगेंची माघार, उपोषण मागे; पुन्हा राज्यभर दौरा

गीता कोडा यांचा जन्म 26 सप्टेंबर 1983 रोजी मेघाहाटू बुरू नावाच्या जिल्ह्यात झाला होता. त्यांनी इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतले आहे. 2009 मध्ये मधू कोडा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर गीता कोडा यांनी राजकारणात प्रवेश केला होता. आता त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

जरांगेंची नार्को टेस्ट करावी, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी त्यांना १०० जन्म घ्यावे लागतील; राणेंचे टीकास्त्र

follow us
  • fb
  • instagram
  • youtube